News Flash

अॅक्टिंग करणा-या कुत्र्याचा व्हिडिओ पाहिलात का?

अशा व्यक्ती सोशल मिडीयाच्या माध्यामातून आपल्यातली कला दाखवत असतात आणि बघता बघता या व्यक्तींचे व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान गाजतात.

अभिनय करणं ही एक कला आहे असं कायमच म्हटलं जातं. मात्र ही कला प्रत्येकालाच जमेलच असं नाही. सध्या पाहायला गेलं तर अनेक कलाकार अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. मात्र काही व्यक्ती अशाही आहेत ज्यांच्यामध्ये अभिनयाचे गुण आहेत मात्र त्यांना योग्य संधी मिळालेली नाही. मग अशा व्यक्ती सोशल मिडीयाच्या माध्यामातून आपल्यातली कला दाखवत असतात आणि बघता बघता या व्यक्तींचे व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान गाजतात. सध्या तसाच एक व्हिडिओ जोरदार गाजत आहे. मात्र व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कोणत्या व्यक्तीचा नसून एका प्राण्याचा आहे.

Mr talent

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

मुक्या प्राण्यांना बोलता येत नसलं तरी ते त्यांच्या वर्तनातून वेळोवेळी आपल्या भावना व्यक्त करत असतात. काही प्राणी इतके हुशार असतात की ते देखील एखाद्या माणसाप्रमाणे अॅक्टिंग करत असतात. सध्या अशाच एका अॅक्टिंग करणा-या कुत्राचा व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याने शेअर केला आहे.

आतापर्यंत या व्हिडिओला ९० हजार व्ह्युज मिळाले आहेत. हरभजनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हाताची बंदूक करुन त्याच्या पाळीव कुत्र्यावर डागतो. त्यावर हा कुत्रादेखील खोटंखोटं मेल्याची अॅक्टींग करत आहे. या कुत्र्याने केलेली ही क्युट अॅक्टींग सध्या जोरदार व्हायरल होत असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर लाईक्सचा पाऊस पडत आहे.

दरम्यान, आतापर्यंत माणसांनी केलेल्या अॅक्टींगच्या किंवा डान्सवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडत होता. मात्र पहिल्यांदाच एका कुत्र्याच्या अॅक्टींगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या कुत्र्याने केलेली अॅक्टींगही इतकी सुंदर आहे  की हा व्हिडिओ सतत  पाहावासा वाटतो. विशेष म्हणजे एक मुका जीवने माणसांप्रमाणे अॅक्टींग केल्यामुळे सा-यांचेच लक्ष त्याचाकडे वेधले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 4:35 pm

Web Title: dog dying acting video is going viral
Next Stories
1 धक्कादायक! प्लॅस्टिक पिशव्यांमुळे व्हेलला गमवावे लागले प्राण
2 हिजाब घातलेल्या ‘त्या’ सौंदर्यवतीची झाली स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड
3 हरवलेला लॅपटॉप शोधणं झालं सोपं, बाजारात आलं स्वस्त आणि मस्त गॅजेट