News Flash

Viral Video : पाणीपुरीही खातानाचा कुत्र्याचा हा व्हिडिओ पाहिलात?

ऐकावे ते नवलच

पाणीपुरी हा आपल्या देशातील बहुतांश लोकांचा वीकपॉईंट असतो. पाणीपुरीचे चाहते कधीही कुठेही आणि कितीही पाणीपुरी खायला तयार असतात. उत्तरेकडे या पदार्थाला गोलगप्पे म्हणून ओळखले जाते. ही पाणीपुरी चक्क एका कुत्र्याला आवडते आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओच व्हायरल झाला आहे.कुत्र्यांच्या विविध करामती आपण अनेकदा पाहतो. आता पाळीव कुत्र्याला सांभाळायचे म्हणजे त्याची काळजी घेणे आले. मग खाण्यापिण्याकडे लक्ष देणे हे एक कामच असते. त्याच्या आवडी निवडीही जपाव्या लागतात. सोशल मीडियावर पाणी पुरी खाणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कुत्रा पाणीपुरी खात असल्याचे दिसत आहे.

१ मिनिटांहून जास्त वेळाचा असलेला हा व्हिडिओ एक महिला कुत्र्याला पाणीपुरी भरवतानाचा आहे. हा कुत्राही व्हिडिओमध्ये अतिशय आवडीने पाणीपुरी खाताना दिसत आहे. रस्त्यावरील एका पाणीपुरीच्या गाडीवर हा कुत्रा आवडीने पाणीपुरी खातो आहे. यामध्ये असलेल्या दोन महिलांपैकी एक जण या कुत्र्याला अतिशय प्रेमाने पाणीपुरी भरवत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्या व्हिडित गाय आणि तिचे वासरू पाणीपुरी खाताना दिसत होते. त्यामुळे प्राण्यांनाही माणसांच्या आवडीचे पदार्थ आवडू शकतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 12:00 pm

Web Title: dog eating panipuri enjoying viral video
Next Stories
1 वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय ‘या’ महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो
2 १८ हजार प्रेक्षकांसमोर तोल घसरून पडलेल्या मॉडेलनं पाहा पुढे काय केलं
3 Google Doodle Celebrates Rukhmabai : ‘गुगल’चा डुडलद्वारे या मराठमोळ्या महिला डॉक्टरला सलाम, जाणून घ्या त्यांचे कार्य
Just Now!
X