26 February 2021

News Flash

नशिबवान! आठ वर्षाच्या कुत्र्याच्या नावावर मालकाने ठेवले ५० लाख डॉलर्स

लुलुच्या नावावर मालकाने इतकी मोठी रक्कम ठेवल्यामुळे इंटरनटेवर आठ वर्षाचा लुलु व्हायरल झाला आहे.

फोटो सौजन्य - रॉयटर्स

माणसांना वडिलोपार्जित किंवा वारसा हक्काने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळाल्याचे आपण ऐकलं आहे. एखाद्या बरोबर रक्ताचं नातं नसलं, तरी मालक त्या व्यक्तीवरील प्रेमापोटी मृत्यूपत्रात कोट्यवधीची तरतूद करुन ठेवतो. अमेरिकेत असंच भाग्य एका कुत्र्याच्या वाट्याला आलं आहे. अमेरिकेत एका व्यक्तीने चक्क कुत्र्याच्या नावावर ५० लाख डॉलर्स ठेवले आहेत.

या व्यक्तीच्या निधनानंतर मृत्यूपत्रातून ही बाब समोर आली आहे. लुलु असं या कुत्र्याचं नाव आहे. बॉर्डर कोली प्रकारात मोडणाऱ्या लुलुच्या नावावर मालकाने इतकी मोठी रक्कम ठेवल्यामुळे इंटरनटेवर आठ वर्षाचा लुलु व्हायरल झाला आहे. अमेरिकन नॅशविले येथे राहणाऱ्या बिल डॉरीस यांचा मागच्यावर्षी मृत्यू झाला.

Video : कचरा फेकायला खिडकीतून खाली वाकला, पण थेट कचऱ्याच्या गाडीत जाऊन पडला

लुलुच्या नावावर ठेवलेले पैसे ट्रस्टकडे ट्रान्सफर करावे, जेणेकरुन त्याच्या देखभालीसाठी या पैशांचा वापर करता येईल, असे बिल यांनी मृत्यूपत्रात नमूद करुन ठेवले आहे. बिल यांनी लुलुला आपली मैत्रिण मार्था बरटॉन यांच्याकडे सोपवले आहे. मार्था लुलुची व्यवस्थित काळजी घेतील, असा त्यांना विश्वास आहे. लुलुच्या देखभालीसाठी मार्था यांना दर महिन्यांना पुरेसे पैसे द्यावेत, असे मृत्यूपत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा- एका लग्नाची आणि फोटोची गोष्ट… लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाला वर्क फ्रॉम होम?

बिल डॉरीस यांच्याकडे किती संपत्ती आहे, ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण द न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, बिल यांच्याकडे प्रचंड संपत्ती असून त्यांनी चांगली गुंतवणूक सुद्धा करुन ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2021 12:54 pm

Web Title: dog inherits usd 5 million from late owner dmp 82
Next Stories
1 Video : कचरा फेकायला खिडकीतून खाली वाकला, पण थेट कचऱ्याच्या गाडीत जाऊन पडला
2 एका लग्नाची आणि फोटोची गोष्ट… लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाला वर्क फ्रॉम होम?
3 धक्कादायक! YouTube वर बनवत होता दरोड्याचा Prank Video, खरा चोर समजून तरुणाने झाडली गोळी; जागीच मृत्यू
Just Now!
X