18 January 2021

News Flash

Viral Video : महाराष्ट्रातील ‘या’ मंदिराबाहेर चक्क कुत्रा भक्तांना देतो ‘आशीर्वाद’

देशभरात व्हायरल झालाय हा व्हिडीओ

(Photos: Screenshot Arun Limadia/Facebook)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मंदिराच्या दाराशी बसलेला एक कुत्रा मंदिरामधून बाहेर पडणाऱ्या भक्तांना आशीर्वाद दिल्यप्रमाणे डोक्यावर पाय ठेवून प्रतिसाद देताना दिसत आहे. आपल्या पुढच्या पायांपैकी एक पाय भक्तांच्या डोक्यावर ठेऊन हा कुत्रा भक्तांना आशीर्वाद देताना दिसतोय. विशेष म्हणजे इंटरनेटवर चर्चेत असणारा हा व्हिडीओ महाराष्ट्रातील आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथे असणाऱ्या श्री सिद्धीविनायकाच्या मंदिरामधील हा व्हिडीओ अरुण लिमाडिया यांनी फेसबुकवरुन शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंदिर परिसरातील एक भटका कुत्रा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच्या दगडी चौथऱ्यावर बसलेला दिसत आहे. मंदिरामधून सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन बाहेर पडणारे भक्त या कुत्रासमोर नतमस्तक झाले की तो आपला पुढचा पाय त्यांच्या डोक्यावर ठेऊन आशीर्वाद देताना दिसतोय. काही भक्तांशी हा कुत्रा हात मिळवतात त्याप्रमाणे पाय पुढे करुन प्रतिसाद देताना दिसतो.

यावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहा…

 

View this post on Instagram

 

A post shared by SMALL-TO-BIGTAILS (@smalltobigtails)

इन्स्टाग्रामवरील स्मॉल टू बिग टेल्स नावाच्या अकाऊंटवरील माहितीनुसार हा कुत्रा रोज याच ठिकाणी बसून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंदिराबाहेर पडताना अशाचप्रकारे प्रेमळ निरोप देतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 12:24 pm

Web Title: dog shakes hands blesses devotees at maharashtra temple scsg 91
Next Stories
1 WhatsApp चं स्पष्टीकरण: मित्र-नातलगांसोबतची प्रायव्हेट चॅटिंग ‘सेफ’, बदल फक्त बिजनेस अकाउंटसाठी
2 WhatsApp पॉलिसीला विरोध! आनंद महिंद्रांनीही डाउनलोड केलं Signal अ‍ॅप
3 Signal ची लॉटरी लागली! लोकप्रियता प्रचंड वाढली, एलन मस्कनंतर पेटीएम सीईओही म्हणाले ‘Signal वापरा’
Just Now!
X