आतापर्यंत तुम्ही कुत्र्यांना खेळताना किंवा कसरती करताना पाहिले असेल. तेही जाऊ दे हल्ली तर अनेक फॅशन शोमध्ये देखील कुत्र्यांकडून रँम्प वॉक करून घेतला जातो. पण हे सारे कधीना कधी आपण पाहतोच. पण टीव्हीमध्ये बघून एखाद्या कुत्र्याला तशी नक्कल करताना तुम्ही क्वचितच पाहिले असेल. यापूर्वी तुम्ही जर असे  पाहिले नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या चेह-यावर आनंद आणेल.

VIDEO : दोस्त असावा तर असा! तिच्यासाठी दोन दिवस तो रेल्वेरुळावर बसून होता

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कुत्रा टिव्हीवर अॅनिमेटेड कार्टुन पाहत आहे. या चित्रपटातही काही कुत्रे उड्या मारताना दिसत आहे. तेच पाहून एका घरातील कुत्रा त्यांची नक्कल करताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा कुत्रा टिव्हीमधील कुत्र्यांना बघून उड्या मारत आहेत, तर कधी भुंकत आहे. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रामाणत व्हायरल होत आहे. अडीच लाखांहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एम एस एन्टरटेन्टने हा व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला आहे.
काही दिवसांपूर्वी कुत्र्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात आपल्या जखमी मित्राच्या सोबत कुत्रा चक्क दोन दिवस रुळांवर बसून होता. त्यांच्या अंगावरून अनेकदा रेल्वे गेली पण तो काही आपल्या मित्राला सोडून जायला तयार नव्हता.

वाचा : ‘तिने’ केली त्याच्यासोबत ७०० किमीची पायी तीर्थयात्रा