28 October 2020

News Flash

Video : …अन् प्रचारसभेत स्टेजवर येताच नाचू लागले डोनाल्ड ट्रम्प

प्रचारसभेतील डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक तीन नोव्हेंबर रोजी आहे. या निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे त्यानुसार येथील प्रचाराचा जोरही वाढताना दिसत आहे. सध्या एका प्रचारसभेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चक्क नाचताना दिसले. ट्रम्प यांनी करोनावर मात केली असून त्यांनी पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात केली आहे. मी आधीपेक्षा जास्त उत्साही आणि शक्तीशाली असल्याचे ट्रम्प सांगत आहेत. आपल्यातील उत्साह ट्रम्प यांनी ओरलँण्ड येथील सॅडफोर्डमधील सभेमध्ये चक्क नाचण्यातून दाखवून दिला. या प्रचारसभेसाठी उपस्थित राहिलेल्या समर्थकांची गर्दी पाहून ट्रम्प यांनी मंचावर येताच डान्स सुरु केला. आपल्या राष्ट्राध्यक्षांना नाचताना पाहून त्यांचे समर्थकही नाचू लागले. ट्रम्प समर्थकांनी या व्हिडीओवर साकारात्मक प्रितिक्रिया दिल्या असल्या तरी विरोधकांनी यावरुन त्यांची खिल्ली उडवली आहे.

आपण करोनावर मात करुन पूर्णपणे बरे झालो आहोत हे दाखवण्यासाठी ट्रम्प ही स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी प्रचारसभेमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केलं असून त्यांनी मास्कही घातलेले नाहीत असाही आरोप विरोधकांनी केला आहे. ट्रम्प यांनी करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या समर्थकांना हटकले नाही ही गोष्टही ट्रम्प यांच्या विरोधकांनी सोशल मीडियावर लक्षात आणून दिली आहे. ट्रम्प यांनी यावेळी दिलेल्या ६५ मिनिटांच्या भाषणामध्ये स्वत:चा उल्लेख करोना पीडित असा केला आहे. मात्र मी सध्या मला आधीपेक्षा अधिक शक्तीशाली आणि उत्साह वाढल्यासारखे वाटत आहे हे ही सांगायला ट्रम्प विसरले नाहीत.

करोनावर मात मिळवल्यानंतर ट्रम्प हे चार राज्यांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. यापैकी पहिल्यांदा ते फ्लोरिडामध्ये जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये ते वेगवेगळ्या राज्यांमधील मतदारांना संबोधित करणार आहे. अमेरिकेमध्ये करोनाच्या संकटाला तोंड देताना सरकारच्या भूमिकेवरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. अनेकांनी सरकारी धोरणांवर ताशेरे ओढले आहेत.

करोना संकट आणि करोनाविरुद्धची लढाई हा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधील महत्वाचा मुद्दा आहे. अमेरिकेत करोनामुळे आथापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ८० लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 8:40 pm

Web Title: donald trump dancing on stage scsg 91
Next Stories
1 ‘गळती’ से मिस्टेक… प्रसाद लाड यांचे हिंदी पाहून नेटकरी म्हणाले, ‘हिंदीसाठी ही पावती फाडायला हवी होती’
2 ‘भाजपाला कोणाच्याही जीवाची किंमत नाही’; काँग्रेसचा #NoLivesMatterToBJP मधून हल्लाबोल
3 Viral Video: नुडल्स बनवण्याची गंगनम स्टाईल; तरुणीची अनोखी पद्धत पाहून नेटकरी आवाक्
Just Now!
X