News Flash

Viral Video : अन् डोनाल्ड ट्रम्पही म्हणू लागले ‘मित्रों’

ट्रम्प आज मोदींशी संवाद साधणार आहेत

Viral Video : अन् डोनाल्ड ट्रम्पही म्हणू लागले ‘मित्रों’
(AP Photo/Seth Wenig)

‘मित्रों.. अच्छे दिन आएगें’… असा आवाज तुम्ही झोपेत जरी ऐकला तरी तो कोणाचा आहे हे ओळखायला आपल्याला वेळ लागणार नाही. कारण दोन वर्षांपूर्वी याच अच्छे दिनची स्वप्न दाखवत भाजप सत्तेत आली होती. आता अमेरिकन जनतेलाही अशीच अच्छे दिनची स्वप्न दाखवत डोनाल्ड ट्रम्पही सत्तेत आले. त्यातून आज रात्री मोदी आणि ट्रम्पमध्ये ‘फोन पे चर्चा’ होणार असल्याची हवा आहे. आता मोदी आणि ट्रम्प यांच्यात रात्री काय चर्चा होईल ती होईल पण सध्या याच प्रसंगांवरून एक डबस्मॅश केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

वाचा : ट्रम्पचा पिच्छा सुटत नाही भौ!

हा व्हिडिओ आहे ट्रम्प यांच्या शपथ विधी सोहळ्याचा. या शपथ विधी सोहळ्याला ट्रम्पने दिलेले भाषण सगळ्यांनाच ठाऊक आहे. याच भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे, ही क्लिप व्हायरल होण्याचेही खास कारणही आहे म्हणा. नेहमीच मोदींच्या तोंडी असलेली काही वाक्य चक्क ट्रम्प यांच्या तोंडी बसवली आहेत. त्यामुळे ही व्हिडिओ क्लिप फारच मजेशीर झाली आहे. ‘स्क्रीन पत्ती’ या फेसबुक अकाऊंटवर ही व्हिडिओ क्लिप टाकण्यात आली अन् बघता बघता ही मजेशीर व्हिडिओ क्लीप व्हायरलही झाली. बरं हा जरी मस्करीचा भाग असला तरी याआधी ट्रम्प यांनी हिंदीत एक दोन वाक्य बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्याचीही व्हिडिओ क्लीप व्हायरल होत होती. आता ट्रम्प मोदींची वाक्य कशी म्हणतील हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.

VIRAL : आठपैकी फक्त एकच व्यक्ती सोडवू शकतो ‘हे’ कोडे?

वाचा : जाणून घ्या कांद्याच्या चकत्या घराच्या कोप-यात ठेवण्याचे फायदे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 4:40 pm

Web Title: donald trump inauguration dubsmash goes viral on social media
Next Stories
1 रामविलास पासवान झाले ‘कन्फ्युज्ड’
2 सावधान! ‘रिलायन्स जिओ’च्या नावे आलेला संदेश तुम्हाला अडचणीत आणू शकतो
3 ए गणपत, चल खाना ला!
Just Now!
X