उत्तर प्रदेशमध्ये एक अजब गजब प्रकार घडला आहे. यूपी पोलिसांनी चक्क काही गाढवांना आणि घोड्यांना चार दिवस तुरुंगात डांबून ठेवलं होतं, चार दिवसांनंतर या प्राण्यांची सुटका करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये ही घटना घडली आहे.

चायवाली लव्हस्टोरी; म्हणून त्या कॅनेडियन कपलने टाकले चहाचे दुकान

त्याचं झालं असं की, एका व्यक्तीनं आपली गाढवं चरायला मोकाट सोडली होती. ही गाढवं पोलीस ठाण्याच्या कुंपणात शिरली. येथे पोलीस ठाण्याच्या सुशोभीकरणासाठी काही झाडं लावली होती, या मुक्या प्राण्यांनी ती खाऊन टाकली. पोलिसांच्या माहितीनुसार, या झाडांवर खूप खर्च करण्यात आला होता. पण, या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं. म्हणून पोलिसांनी दोन गाढवांना आणि दोन घोड्यांना ताब्यात घेतलं. चार दिवस तुरूंगात ठेवल्यानंतर अखेर त्यांची सुटका करण्यात आली.

फक्त माणसांचेच नाही तर मुक्या जीवांचेही रक्षक आहेत पोलीस

प्राण्यांना अटक करून तुरुंगात डांबण्याची ही काही यूपी पोलिसांची पहिलीच वेळ नाही. याआधीही क्षुल्लक कारणांवरून प्राण्यांना तुरुंगात डांबून यूपी पोलिसांनी आपलं हसं करून घेतलं होतं. काही महिन्यांपूर्वी कॉलेजच्या कुंपणात शिरलेल्या म्हशीलाही पोलिसांनी अटक केली होती. गेल्यावर्षी तर शेळ्यांना देखील तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.