News Flash

…म्हणून जीन्स पँट धुण्याची गरज नाही!

डेनिम एक्सपर्टच्या मते जीन्स वारंवार धुण्याची गरज नाही

जे कपडे धुण्याची फारशी गरज भासत नाही अशा प्रकारत जीन्स मोडतात

तुम्ही जीन्स कितींदा धुता? आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा की दोन महिन्यातून एकदा? असे अनेक आहेत जे जीन्स कित्येक दिवस धूतच नाही. बरं याबद्दल विचारलं तर जीन्स काय धुण्यासाठी असते का असा खोचक सवालही विचारतील, पण या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे जीन्सला खरंच धूण्याची गरज नसते.

वाचा : जीन्सला हा छोटा कप्पा का असतो माहितीये?

लिवाईसच्या सीईओंनी जीन्स वापरण्याबाबत काही टीप्स दिल्या होत्या. त्यात जीन्सचा रंग दिर्घकाळ टिकण्यासाठी त्या न धुण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. जीन्स वारंवार धुतल्याने त्याचा रंग जातो त्यामुळे तिचा रंग टिकवण्यासाठी त्या धुण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुळात जे कपडे धुण्याची फारशी गरज भासत नाही अशा प्रकारत जीन्स मोडतात. डेनिमचा कपडा मुळात सैनिकांसाठी बनवण्यात आला होता. हा कपडा जास्त टिकाऊ असल्याने इतर कपड्यांसारखे त्याला वारंवार धुण्याची गरज नसते. पुढे डेनिम सामान्य लोकांतही अधिक लोकप्रिय होऊ लागली. एक आरामदायी आणि फॅशनेबल वस्त्र म्हणून जीन्सने कपाटात स्थान मिळवले आहे. पण अनेक जण ती धुण्यासाठी टाळाटाळ करतात.

डेनिम एक्सपर्टनुसार जीन्स या वारंवार धुण्याची गरज नसते. असे केल्याने त्यांचा रंग फिटक होऊ शकतो. पण या जीन्स वारंवार न धुतल्याने  त्वचारोगही होऊ शकतो. पण यावर उपाय म्हणून जीन्स प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रिजरमध्ये ठेवण्याचा सल्ला ते देतात. फ्रिजरमध्ये जीन्स ठेवली असता त्यामध्ये बॅक्टेरिया वाढत नाही किंवा कडक उन्हात जीन्स सुकवण्याचा सल्ला ही डेनिम एक्सपर्ट देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2016 6:19 pm

Web Title: dont wash your denim jeans
Next Stories
1 ..अन् ट्विटरने स्वतःच्याच सीईओचे अकाऊंट केले निलंबित
2 दुबईत राहणा-या ‘या’ भारतीयाच्या नावावर विश्वविक्रम
3 बँकेने दिली १० रुपयांची १५ किलो नाणी
Just Now!
X