जगभरामध्ये ड्रायव्हलेस म्हणजेच चालक नसणाऱ्या स्वयंचलित गाड्या बनवण्यासंदर्भात संशोधक आणि वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भारतामधील एक तरुण शेतकरी रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेती करतोय. हे वाचण्यासाठी तुम्हाला थोडं गोंधळात टाकणारं वाटेल मात्र एका १२ पास विद्यार्थ्याने ही करामत करुन दाखवली आहे. राजस्थानमधील बारन जिल्ह्यात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या योगेश नागर या तरुणाने ही कमाल केली आहे. आपल्या वडीलांना होणारा त्रास पाहून योगेशला रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची कल्पना सुचली. आता हा ट्रॅक्टर केवळ हातातील रिमोटच्या मदतीने शेत नांगरण्यापासून ते अनेक काम करतो. विशेष म्हणजे हा रिमोट अगदी एक किमी अंतरावरुन या ट्रॅक्टरवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. महिंद्रा कंपनीच्या या ट्रॅक्टरच्या पुढील भागात लावण्यात आलेल्या सेन्सॉर्समुळे ट्रॅक्टरसमोर कोणी आल्यास ट्रॅक्टरला ब्रेक लागतो.

अशी सुचली कल्पना

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

तसा योगेशने हा ट्रॅक्टर बनवून तीन वर्ष झाली आहेत. मात्र आता शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ट्रॅक्टरचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आलाय. २०१७ साली वयाच्या १९ व्या वर्षी १२ वी पास झाल्यानंतर बीएससीसाठी (गणित विषय) प्रवेश घेतल्यानंतर योगेशने हा रिमोट कंट्रोल ट्रॅक्टर तयार केला. योगेशचे वडील रामबाबू नागर हे पेशाने शेतकरी आहेत. मात्र ट्रॅक्टर चालवताना रामबाबू यांच्या पोटात दुखायचे. डॉक्टरांनी रामबाबू यांना शेतात ट्रॅक्टर चालवू नका असा सल्ला दिला. वडिलांना होणारा त्रास पाहून योगेशने शेतात दोन महिने ट्रॅक्टर चालवला. मात्र चालक नसणारा ट्रॅक्टरही शेतात काम करु शकतो अशी कल्पना दोन महिने ट्रॅक्टर चालवल्यानंतर योगेशला सुचली.

आधी वडिलांचा विश्वास बसला नाही नंतर मात्र…

योगेशने आपल्या वडिलांना या रिमोट कंट्रोल ट्रॅक्टरच्या कल्पनेबद्दल सांगितलं. सुरुवातीला त्यांना यावर विश्वास बसला नाही मात्र मुलाचा उत्साह आणि गरज पाहून रामबाबू यांनी योगेशला दोन हजार रुपयांमध्ये या ड्रायव्हरलेस ट्रॅक्टरचं मॉडेल बनवण्यास सांगितलं. वडिलांनी दिेलेल्या पैशांमधून योगेशने काही गरजेचं सामान विकत आणलं आणि एक सॅम्पल मॉडेल त्यांना बनवून दाखवलं. त्यावेळेस असं काही घडू शकतं यावर रामबाबू यांचा विश्वासच बसत नव्हता. आपल्या सॅम्पलच्या मदतीने योगेशने रिमोट कंट्रोलने ट्रॅक्टर मागे पुढे करुन दाखवल्यानंतर आपल्या मुलाला संधी दिल्यास तो नक्कीच प्रत्यक्षात वापरता येणारा रिमोट कंट्रोलवाला ट्रॅक्टर बनवू शकतो असा विश्वास रामबाबू यांना वाटला आणि त्यांनी योगेशला मदत करण्याचा निर्णय घेतला.

५० हजार रुपयांचं कर्ज घेतलं

आपलं ड्रायव्हरलेस ट्रॅक्टरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगेशने वडिलांकडून तसेच ओळखीच्या लोकांकडून एकूण ५० हजार रुपये कर्ज घेतलं. त्यानंतर त्याने या पैशांमधून सामान विकत आणलं आणि दोन महिन्यांच्या संशोधनानंतर आणि प्रयत्नानंतर असा एक मोठा रिमोट कंट्रोल तयार केला की ज्याच्यामदतीने थेट एक किलोमीटर रेंजवरुनही ट्रॅक्टर चालवता येईल.

येऊ लागल्या ऑर्डर

योगेशने बनवलेला हा रिमोट कंट्रोल ट्रॅक्टरमधील ट्रान्समिटरशी कनेक्ट होते. अशाप्रकारे ट्रॅक्टर चालवणारे रिमोट कंट्रोल बनवून देऊन तसा बदल आपल्या ट्रॅक्टरमध्ये करुन घेण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल साठ जणांनी योगेशकडे संपर्क केला आहे. अनेक वेबसाईट्सने तसेच चॅनेल्सनेही योगेशच्या या संशोधनाची दखल घेतली.