23 February 2019

News Flash

VIRAL : बैलांची झुंज सोडवायला गेला मद्यपी, पाहा नंतर काय घडलं

हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे

भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या मद्यपीला आपल्या शिंगानं उचलून बैलानं रस्त्याच्या कडेला फेकून दिलं.

दोघांच्या भांडणात तिसऱ्या शहाण्या माणसानं पडून नये असं म्हणतात. आता ते का? असा प्रश्न तुम्हाला या फुकटच्या सल्ल्यावर पडला असेल तर जरा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हि़डिओ पाहा. युट्यूबवरच्या मजेशीर व्हिडिओंच्या यादीत हा व्हिडिओ आहे. मद्यप्राशन करून अक्षरश: हेलकावे खात चालणारा हा मद्यपी बैलांची झुंज सोडवायला गेला. आता दोघांच्या भांडणात तिसऱ्यानं पडू नये असा फुकटचा पण फायद्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न अनेकांनी त्याला दिला. पण दुसऱ्यांचं ऐकतील ते मद्यपी कसले. तेव्हा इतरांचे सल्ले धुडकावून बैलांची झुंज सोडवायला हा अतिशहाणा गेला खरा. पण बैलांपुढे सेकंदभरही त्याचा निभाव लागला नाही.

आलिया गावात अजब वरात, पोराला नायला पोरगी दारात!

‘या’ कॅमेरामनने आणला ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा रडीचा डाव जगासमोर

छत्तीसगढमधला हा व्हिडिओ असल्याचं समजत आहे. हा व्हिडिओ तसा जूना आहे. पण सोशल मीडियावर मात्र पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यात भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या मद्यपीला आपल्या शिंगानं उचलून बैलानं रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. अखेर आपण फुटकचा सल्ला न मानण्याची चूक केल्याचं लक्षात येताच हा मद्यपी गपगूमानं बसून राहिला.

First Published on March 27, 2018 12:17 pm

Web Title: drunk man tries to stop two bulls from fighting