मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणारे लोक आणि त्यामुळे होणाऱ्या अपघात भारतात नेहमीचेच. रात्रीच्यावेळी अशाचपद्धतीने दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या एका महिलेने कोलकाता येथे दुसऱ्या एका गाडीला धडक दिली. यावेळी यठिकाणी असलेला एक टॅक्सीचालक या महिलेची मदत करण्यासाठी पुढे आला. मात्र महिलेने या टॅक्सीचालकावर हल्ला केला. हा सगळा प्रकार जवळच्या पोलिसचौकीला कळविण्यात आल्यावर रात्रीच्यावेळी भर रस्त्यात चाललेला हा तमाशा पाहून याठिकाणी पोलिस आले.

दक्षिण भागातील बिधाननगर पोलिसस्टेशनचे कॉन्स्टेबल याठिकाणी काही वेळात हजर झाले. इतके सगळे होऊनही ही महिला आपल्या गाडीतच बसून होती. तिच्यासोबत एक पुरुष आणि एक महिला असे दोघेही होते. पोलिसांनी महिलेला गाडीच्या बाहेर येण्यास सांगितले तेव्हा मद्यधुंद महिलेने त्यासाठी नकार दिला. इतकेच नाही तर या महिलेने पोलिस कॉन्स्टेबलला आपल्याकडे खेचले आणि ती त्याला किस करायला लागली.

नशेत असणाऱ्या महिलेने अशाप्रकारे कृत्य केल्याने पोलिसांसाठी अतिशय अवघड स्थिती निर्माण झाली. ही घटना अतिशय वेगळी असल्याने पोलिसांसाठीही हे अतिशय ऑकवर्ड करणारे होते. या प्रकारानंतर पोलिस कॉन्स्टेबलने एका स्थानिक महिलेच्या मदतीने या दारुच्या नशेत असलेल्या महिलेला पोलिसस्टेशनला नेले.