आपल्या गाडीला एखाद्या विशेष पद्धतीचे कव्हर घालणे ही म्हणावी तर काही खास गोष्ट नाही. पण अवघ्या १५ व्या वर्षी तुमच्या मालकीची फरारी असणे आणि तिला तुम्हाला पाहिजे तसे कव्हर असणे ही नक्कीच विशेष बाब आहे. दुबईमधील एका १५ वर्षांच्या मुलाकडे आपल्या मालकीची गाडी असून तिने त्याला लुई व्हिटोनच्या प्रिंटने सजवले आहे. अशाप्रकारे गाडीला कव्हर करुन त्याने डिझाईन खास कस्टमाईज केली आहे.

आता १५ वर्षांच्या मुलाकडे काय असणार असे आपल्याला वाटते खरे. मात्र दुबईमध्ये राहणाऱ्या आणि श्रीमंत घरातील या मुलाने आपली गाडी अतिशय अनोख्या पद्धतीने सजवली आहे. तसे पाहता १५ व्या वर्षी चारचाकी चालविणे दुबईमध्येही कायद्याने गुन्हा आहे १८ व्या वर्षानंतर याठिकाणी चारचाकी चालविता येते. त्यामुळे त्याच्याकडे कितीही भारीतल्या गाड्या असल्या तरी तो त्या चालवू शकत नाही. मात्र त्याच्या स्वतःच्या बेंटली आणि यीझी या दोन गाड्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्याकडे असलेल्या गाड्यांची छायाचित्रे त्याने अपलोड केली आहेत.

इतकेच नाही तर या मुलाकडे स्निकर्सचे २ लाख जोड आहेत. त्याची किंमत १ लाखांहून अधिक आहे. हा मुलगा दर महिन्याला ३ लाखांहून अधिक रुपये कपड्यावर खर्च करतो. याशिवाय त्याला प्राण्यांची आवड असल्याने त्याच्याकडे असणाऱ्या लहान प्राणीसंग्रहालयात अनेक विदेशी प्राणी त्याचे पाळीव प्राणी म्हणून राहतात. या मुलाचे नाव बेलहसा असून तो दुबईमधील कोट्याधीश असणाऱ्या सैफ अहमद बेलहसा या यशस्वी उद्योगपतीचा मुलगा आहे. इतकेच नाही तर या मुलाचा स्वतःचे यूट्यूब चॅनलही असून तो त्यावर वेगवेगळ्या पोस्ट करत असतो.