27 February 2021

News Flash

दुबई : पंतप्रधानांची पत्नी ३१ दशलक्ष पौंड घेऊन पळाली लंडनला

जर्मन दुतावासाने हया बिंत यांना देशाबाहेर पडण्यासाठी मदत केल्याची चर्चा आहे.

दुबईची राणी हया

संयुक्त अरब अमिरातचे (युएई) पंतप्रधान आणि दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची सहावी पत्नी हया बिंत अल हुसेन ३१ दशलक्ष पौंड इतकी रक्कम घेऊन देश सोडून गेल्याचं वृत्त आहे. आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन हया यांनी देश सोडला. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्याला असल्याचं समजत असून त्यावरून जर्मनी आणि युएई या दोन देशांत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कारण जर्मन दुतावासाने हया बिंत यांना देशाबाहेर पडण्यासाठी मदत केल्याची चर्चा आहे.

दुबईचे राजे शेख मोहम्मद यांच्याकडे हया यांनी तलाक मागितला आहे. मात्र अद्याप दोघांचा तलाक झालेला नाही. हया जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची सावत्र बहीण आहे. देश सोडल्यानंतर हया यांनी आश्रयासाठी जर्मनीकडे विनंती केली. ऑक्स्फर्डमध्ये शिकलेल्या हया २० मे पासूनच सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यांनी सार्वजनिक उपक्रमांनाही तूर्त विराम दिला आहे.

हया यांना परत पाठवा अशी मागणी दुबईचे राजे शेख मोहम्मद यांनी जर्मन सरकारकडे केल्याचे समजते. मात्र त्यांना परत पाठवण्यासाठी जर्मन सरकारने विरोध केला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शेख मोहम्मद यांचे नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहे. दरम्यान दुबईच्या शाही घराण्यातून महिलेने पलायन करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी शेख मोहम्मद यांची मुलगी राजकुमारी लतीफाने देश सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिला भारतीय तटरक्षक दलाने गोवा येऊन पकडून दुबईला परत पाठवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 2:30 pm

Web Title: dubai princess haya flees uae with money kids ssv 92
Next Stories
1 ‘प्रायव्हेटवाल्यांनी विमानाने जायचं का?’, ‘स्वत:ची बोट असणाऱ्यांनीच ऑफिसला जा’; एम इंडिकेटवरील मजेदार चॅट
2 VIDEO: प्लॅटफॉर्मवर लोकल आली आणि महिला डब्याजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली
3 ‘मला ट्रोल करण्याऐवजी तुमचे काम करा’, स्वरा भास्करने IPS अधिकाऱ्याला सुनावले खडेबोल
Just Now!
X