X

अवतीभोवती अनेक कलाकारांची मांदियाळी; ‘हा’ मुलगा आहे तरी कोण?

१५ वर्षांच्या मुलाकडे आहे फेरारी

दिसायला अगदी सामान्य मुलासारखा असणारा हा मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सलमान खान, शाहरुख खान, शिल्पा शेट्टीपासून ते जॅकी चॅन, लिओनल मेस्सी, विझ खलिफापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांची, खेळांडूची मांदियाळी त्याच्या अवतीभोवती असते. त्यांच्यासोबतचे फोटो तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करतो. त्यामुळे या मुलाबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांमध्ये आहे. दुबईमधील अब्जाधीश व्यावसायिक सैफ अहमद बेल्हसा यांचा तो मुलगा आहे.

Viral Video : पाहा, हॉटेलचं बिल चुकवण्यासाठी त्यानं काय केलं?

त्याचं नाव राशिद बेल्हसा असून, तो पंधरा वर्षांचा आहे. त्याच्याकडे फेरारी, बेंटले, यझदी सारख्या आलिशान गाड्या आहे. काही दिवसांपूर्वी आपली कोट्यवधी किंमतीची फेरारी त्याने लुई व्हिटॉनच्या प्रिंटने सजवली होती. त्याला दुबईत ‘मनी किक्स’ म्हणून ओळखलं जातं. त्याच्या अलिशान लाईफस्टाईमुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. रशिदचं स्वत:चं ऑनलाइन स्टोअरदेखील आहे. स्निकर आणि बॅगची तो विक्री करतो. यातून तो कोट्यवधी रुपये महिन्याला कमावतो.

महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि वाघ, सिंह पाळण्याची रशिदला हौस आहे. त्याचं फार्म हाऊसदेखील आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फार्म हाऊसवर दरवर्षी अनेक सेलिब्रिटी येत असल्याचं त्यानं सांगितलं. या सेलिब्रिटींचं आदरातिथ्य करणं मला नेहमीच आवडतं, पण कधी कधी मी खूपच दमतो. त्यामुळे नाईलाजाने मी सेलिब्रिटींना नकारही देतो, असंही तो म्हणला.

त्याच्या एकंदर अलिशान लाईफस्टाईलने प्रभावित होऊन एका चॉकलेट बारने त्यांच्याकडील सर्वात महागड्या मिल्कशेकला त्याचं नाव देखील दिलं आहे.

वाचा : काय हा ‘गाढव’पणा!; त्यानं चक्क अलिशान गाडी खायचा प्रयत्न केला

  • Tags: Dubai teen Rashed Belhasa,
  • Outbrain