लहान मुलींची उंचीही माझ्यापेक्षा जास्त आहे…माझी उंची कधी वाढेल? वय 22 वर्षे पण शरीरयष्ठी अगदी लहानग्यांप्रमाणे असलेल्या आफरीनला हा प्रश्न कायम सतवायचा. तीन महिन्यांमध्ये तिने आयुर्वेदिक चूर्णच्या तीन बाटल्या संपवल्या, पण काहीच फरक नाही पडला. अखेर निराश झालेल्या आफरीनने स्वतःचं जीवन संपवलं. कमी उंचीमुळे आफरीन काही काळापासून तणावात होती असं सांगितलं जात आहे. सोमवारी गुजरातच्या सूरतमध्ये आपल्या राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मिळाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूरतच्या मगदूलनगरमध्ये ही घटना घडली. आफरीनने आत्महत्या करण्यापूर्वी आपला पती अन्वर याला ‘टॉइलट क्लीनर’ खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पाठवलं होतं. अन्वर एक फोटो स्टुडिओ चालवतो. एका तासाने तो परतला आणि त्याने आफरीनला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं. कमी उंची असल्यामुळे आफरीन तणावात असायची, अशी माहिती अन्वर आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी पोलिसांना दिली. तीन फुट 9 इंच लांब इतकी तिची उंची होती. तर, पती अन्वरची उंची 5 फुट 4 इंच होती. तीन महिन्यांपूर्वी आफरीनने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहून उंची वाढवण्यासाठी एका प्रसिद्ध कंपनीची आयुर्वेदिक पावडर वापरण्यास सुरूवात केली होती. पण, त्याने तिच्या उंचीमध्ये काहीच फरक न पडल्याने ती दिवसेंदिवस अजून तणावात जात होती.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
mentally retarded girl rape marathi news
धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

“घरगुती कार्यक्रम किंवा अन्य कार्यक्रमांवरुन परतल्यानंतर आफरीन अत्यंत दुःखी व्हायची, आणि लहान मुलंही माझ्यापेक्षा मोठी दिसतात असं ती म्हणायची. गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड चिंतेत दिसत होती. अनेक गोळ्या-औषधं घेतल्यानंतरही उंची वाढत नसल्याचं ती म्हणाली होती. तीन महिन्यांमध्ये तिने एका प्रसिद्ध कंपनीचे आयुर्वेदिक चूर्ण घेतले, पण त्याचाही काही फायदा झाला नाही”, अशी माहिती अन्वरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. पोलिसांना यावर विश्वास होत नव्हता पण शेजाऱ्यांशी आणि नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांना खात्री झाली. दोघांमध्ये कोणताही वाद नव्हता पण आफरीन ठेंगणेपणाला वैतागली होती. ती नेहमी उंच होण्याची इच्छा असल्याचं म्हणायची अशी माहिती शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

आफरीन ठेंगणेपणामुळे इतकी चिंतेत होती की, तिने तळलेले पदार्थ खाणंही बंद केलं होतं. औषधांचा चांगला परिणाम व्हावा यासाठी तिने डायटिंगही सुरू केलं होतं. लग्नाआधीही आफरीनने उंची वाढवण्यासाठी अनेक गोळ्या-औषधे घेतले होते, पण तिची उंची वाढली नाही.