News Flash

शाळेतील मुलांनी साकारलेली महिषासुरमर्दनी पाहून आनंद महिंद्रा आणि रविना टंडन म्हणतात…

मुलांनी साकारले देवीचे स्वरुप, फोटो झाला व्हायरल

आनंद महिंद्रा आणि रविना टंडन

देशभरामध्ये नवरात्री आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मिडियावरही हा उत्साह दिसून येत आहे. रोज वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांमधील फोटो, गरब्याचे व्हिडिओ अशा अनेक गोष्टी सोशल मिडियावर दिसून येत आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या देवींचेही फोटो व्हॉट्सअप स्टोरी आणि फेसबुकवर शेअर केले आहेत. असं असतानाच एका खास फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घतले आहे. शाळेतील काही लहान मुलांनी साकारलेली दूर्गा या फोटोमध्ये दिसत असून ट्विटवर या फोटोची बरीच चर्चा आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा आणि अभिनेत्री रविना टंडनही या फोटोच्या प्रेमात पडले असून त्यांनी हा फोटो ट्विटवरुन शेअर केला आहे.

‘मी पाहिलेला हा आतापर्यंत सर्वात गोड फोटो आहे. या फोटोमध्ये लहान मुलांनी दुर्गा माता साकारली आहे,’ असं ट्विट रविनाने केले आहे.

या फोटोमध्ये शाळेच्या गणवेशामध्येच मुलांनी महिषासुरमर्दनी स्वरुप साकारले आहे. एका युजरने पोस्ट केलेला हा फोटो आनंद महिंद्रांनीही रिट्विट केला आहे. ‘मी मंडपामध्ये पाहिलेल्या कोणत्याही देखाव्यापेक्षा हा फोटो जास्त सरस आहे. जेव्हा जेव्हा मानवामधील भावना दाखवायच्या असतात तेव्हा मुलं ते उत्तम प्रकारे दाखवतात. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा,’ असं ट्विट महिंद्रा यांनी केले आहे.

या फोटोला हजारोंच्या संख्येने रिट्विट केले असून शेकडो युझर्सने यावर कमेंट करुन मुलांच्या या कलाकारीचे कौतूक केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 12:54 pm

Web Title: durga puja 2019 anand mahindra raveena tandon love this depiction of goddess durga by school kids scsg 91
Next Stories
1 १३ वर्षांनंतर पुन्हा रस्त्यांवर धावणार ‘बजाज चेतक’? या तारखेला लाँच होण्याची शक्यता
2 ‘अ‍ॅपल’वर ‘Sign in with Apple’ फीचर चोरल्याचा आरोप
3 गुजरातमध्ये अचानक कोसळला पूल, मधोमध लटकल्या कार
Just Now!
X