News Flash

‘विराट कोहली म्हणजे क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो’

क्रिकेटबाबत माझ्या छोट्या भावाशी चर्चा करावी असा आग्रहही मी विराटला केला होता. मी विराटला पाहतो तेव्हा मला क्रिकेटमधील ख्रिस्तियानो रोनाल्डो दिसतो

‘विराट कोहली म्हणजे क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो’

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचे जगभरात लाखो चाहते आहेत, पण अजूनपर्यंत त्याची तुलना कोणा दिग्गज फुटबॉलपटूसोबत झाली नव्हती. मात्र, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने कोहलीचं कौतुक करताना त्याची तुलना दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यासोबत केली आहे.  विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानावरचा रोनाल्डो आहे, असं आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळणारा ब्राव्हो म्हणाला.

‘विराटसोबत माझे चांगले संबंध आहेत. माझ्या लहान भावासोबत कोहली अंडर-19 खेळलाय. तू विराट कोहलीचं अनुकरण करत जा असं मी माझ्या भावाला नेहमी सांगायचो. फलंदाजीबाबत आणि क्रिकेटबाबत माझ्या छोट्या भावाशी चर्चा करावी असा आग्रह देखील मी विराटला केला होता. मी विराटला पाहतो तेव्हा मला क्रिकेटमधील ख्रिस्तियानो रोनाल्डो दिसतो’ असं ब्राव्हो म्हणाला. तसंच, ‘मी आता भारतात आहे म्हणून मी विराटचं कौतुक करतोय असं नाहीये’ हे देखील ब्राव्होने स्पष्ट केलं. क्रिकेटसाठी विराटच्या मेहनतीला मी सलाम करतो. विराट कोहली अत्यंत प्रतिभावान खेळाडू असून, आजपर्यंत जे काही यश त्याला मिळालंय त्यासाठी तो पात्र आहे असं देखील ब्राव्हो म्हणाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 2:31 pm

Web Title: dwayne bravo said virat kohli is cristiano ronaldo of cricket
Next Stories
1 …अन्यथा सुशीलकुमारने रिओ २०१६ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं असतं – बाबा रामदेव
2 VIDEO : विराट कोहली थिरकला डान्स फ्लोअरवर
3 युवा जोशाला अनुभवाचा साज!
Just Now!
X