News Flash

समु्द्रात होणारे भूकंप, त्सुनामीचा अंदाज केबलच्या मदतीने व्यक्त करता येईल?; गुगलचे अधिकारी म्हणतात…

मागील काही आठवड्यांपासून जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत

प्रातिनिधिक फोटो (Photo: Wikimedia Commons)

समुद्राच्या तळाशी होणाऱ्या भूगर्भामधील हालचालींचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तसेच त्सुनामीचा इशारा देण्यासाठी ऑप्टीकल फायबरचा उपयोग करता येईल का असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जगभरातील अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यांपासून सौम्य ते मध्यम स्वरुपाचे भूकंपाचे धक्के बसल्यानंतर मागील वर्षी प्रयोग करण्यात आलेल्या या संशोधनासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे. यासंदर्भात गुगलच्या बेवसाईटवर एक ब्लॉगही पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये गुगलच्या गोबल नेटवर्किंगचे वाले कमलोव्ह यांनी अशाप्रकारे भूकंपाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी ऑप्टीकल फायबरचा उपयोग करणं शक्य होणार असल्याचे म्हटलं आहे.

सेन्सींग अॅप्लिकेशन्ससाठी ऑप्टीकल फायबरचा वापर आधीपासूनच केला जात आहे. मात्र हे तंत्रज्ञान केवळ १०० किमी अंतरापर्यंत माहिती पोहचवण्यासाठी वापरले जायचे. आता उपलब्ध यंत्रणांच्या मदतीनेच हजारो किमी दूरपर्यंत माहिती पाठवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. आधी या तंत्रज्ञानासाठी विशेष सेन्सरिंग फायबर केबल आणि यंत्रांचा वापर केला जायचे. नवीन तंत्रज्ञानामध्ये सध्या समुद्राखालून माहितीचे देवणाघेवण करण्यासाठी म्हणजेच डेटा ट्रान्फऱसाठी वापरण्यात येणाऱ्या केबलचाच वापर करण्यात येत आहे. सध्या जगभरामध्ये फायबर ऑप्टीकल वायर्सच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान वापरता येणार असल्याचे कमलोव्ह यांनी म्हटलं आहे.

जगभरातील वेगवेगळ्या खंडांमध्ये माहितीची देवणाघेवाण करण्यासाठी समुद्रामधील ऑप्टीकल फायबर केला जातो. इंटरनेट कनेक्शनसाठी या वायर्सचा वापर करण्यात येतो. गुगलच्या या अशा ऑप्टीकल फायबर्सच्या जाळ्यामुळेच जगभरातून गुगलच्या माध्यमातून माहिती शेअर, सर्च करता येते. याच वायर्समुळे जगभरामध्ये इंटरनेटच्या मदतीने माहितीची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण करता येते. लाइट पल्सेसच्या मदतीने डेटा २ लाख ४ हजार १९० किमी प्रती सेकंद वेगाने या केबलमधून डेटा ट्रान्सफर करता येतो. हा डेटा दुसऱ्या बाजूला असणाऱ्या यंत्रांच्या माध्यमातून स्वीकारला जातो आणि तो डिजीटल सिग्नलिंग प्रोसेसिंग तंत्रज्ञानाचा मदतीने योग्य ठिकाणी पोहचवण्यात येतो. या ऑप्टीकल फायबरमधून जेव्हा लाइटच्या माध्यमातून डेटा पाठवला जातो तेव्हा त्याचा वेग स्टेट ऑफ पोलरायझेन (एसओपी) ट्रान्समिशन पद्धतीने मोजता येतो. या एसओपीवर मेकॅनिकल अडथळ्यांचा परिणाम होतो. याच गुणधर्माचा वापर करुन समुद्राच्या तळाशी होणाऱ्या हालचलाचींवर लक्ष ठेवणं शक्य होणार असल्याचे कमलोव्ह ब्लॉगमध्ये सांगतात.

२०१३ मध्ये जमिनीवर पसरवण्यात आलेल्या वायर्सच्या माध्यमातून डेटा ट्रान्सफर करताना एसओपीवर काय परिणाम होतात याबद्दल गुगलने संशोधन केलं होतं. मात्र त्यावेळी आजूबाजूच्या परिस्थिती आणि वातावरणाचा एसओपीवर अधिक परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने या संशोधनाचा फारसा उपयोग झाला नाही जमिनीमध्ये होणाऱ्या हालचाली मोजण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयोग अयशस्वी ठरला.

त्यानंतर २०१८ साली वैज्ञानिकांनी जमिनीवर आणि समुद्राच्या तळाशी होणाऱ्या भूकंपांचा अंदाज व्यक्त करण्यासंदर्भातील संशोधनामध्ये यश आल्याचा अहवाल सादर केला. या प्रयोगामध्ये त्यांनी नॅरोबॅण्ड अल्ट्राबेस लेझर तंत्रज्ञान वापरलं होतं. मात्र या प्रयोगात त्यांनी जमिनीवरील संशोधनासाठी ५३५ किमीचा तर समुद्रातील संशोधनासाठी केवळ ९६ किमीच्या अंतरासाठी उपयोगी ठरणारे संशोधन केलं होतं. हे संशोधन म्हणजे समुद्राच्या दृष्टीने उथळ पाण्यामधील संशोधन असल्याचेच कमलोव्ह म्हणतात. हे तंत्रज्ञान जगभरात वापराचे झाल्यास त्याची चाचणी खोल समुद्रामध्ये घावी लागेल तिथे या माध्यमातून लांबपर्यंत डेटा ट्रान्सफर करता येईल का याची तपासणी करणं शक्य होईल असं मत कमलोव्ह यांनी मांडले आहे. याच संशोधनाच्या आधारे स्पेक्टर सिग्नल तंत्रज्ञानाच्या आधारे गुगलने मागील वर्षी स्ट्रोक्स पॅरामिटर्सचा अभ्यास करुन भूकंपाची तिव्रता मोजण्याचा प्रयत्न केला. जो काही प्रमाणात यशस्वी झाला. यासंदर्भात ‘सायन्स’ मासिकामध्येही सविस्तर माहिती छापून आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 1:16 pm

Web Title: earthquake detection with submarine cables is possible says google global networking valey kamalov scsg 91
Next Stories
1 कारण त्यांच्याकडे पर्याय नव्हता… विद्यार्थी शिव्या देऊ लागल्यानंतर त्यांना काय करावं कळेना, अखेर….
2 Scary! नदीमधून जाताना मगरीने केला हल्ला, कॅमेरात कैद झाला थरार
3 मिळालं चुकीचं लॉटरीचं तिकिट; झाला कोट्यधीश
Just Now!
X