महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी तब्बल नऊ तास चौकशी गेली. तसेच गरज भासल्यास त्यांनी पु्न्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल असे संकेतही सूत्रांनी दिले आहेत. आयएल ॅण्ड एसएफ या खासजी वित्तीय पायाभूत संस्थेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार, अनियितेत ठाकरे यांचा सहभाग आहे का, हे तपासण्यासाठी ईडीचे सहाय्यक संचालक राणा बॅनर्जी यांनी राज ठाकरेंना सोमावारी चौकशीची नोटीस पाठवली होती. राणा बॅनर्जी यांनीच राज ठाकरेंची चौकशी केली. मात्र आता राणा बॅनर्जींचे केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर असलेल्या कनेक्शनची चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. यामुळेच राणा यांनी आपले फेसबुक अकाऊण्ड डिअॅक्टीव्हेट केल्याचे बोलले जात आहे.

मुंबईच्या ईडी कार्यालयाच्या माध्यमातून अनेक बड्या प्रकरणांचा तपास सुरु आहे. यामध्ये आयएल अॅण्ड एफएस, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी प्रकरणांचा समावेश आहे. त्यातच आता कोहिनूर मिल प्रकरणाच्या चौकशीला ईडीने सोमवारपासून सुरुवात केली आहे. याचसाठी या प्रकरणामध्ये उन्मेश जोशी, राजन शिरोडकर आणि राज ठाकरे यांना चौकशीची नोटीस पाठवण्यात आली होती. ही नोटीस राणा बॅनर्जी यांनी बजावली होती. गुरुवारी राज यांची चौकशी करण्याआधी कोहिनूर प्रकरणात त्यांच्याबरोबर गुंतवणूक करणाऱ्या उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकर यांचीही चौकशी करण्यात आली. राणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जोशी आणि शिरोडकर यांनी १२ तासांहून अधिक काळ चौकशी केली. मूळ कस्टम खात्यामध्ये कार्यरत असणारे राणा हे प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम करत आहेत. कोहिनूर मिल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते खास दिल्लीवर मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते.

‘ईडी’ने १६ ऑगस्ट रोजी जारी राज ठाकरेंच्या नावे जारी केलेल्या नोटीसची बातमी सोमवारी वाऱ्यासारखी पसरली. प्रसारमाध्यमांपासून सोशल नेटवर्किंगवर राज यांना ‘ईडी’ने चौकशीची नोटीस पाठवल्याची चांगलीच चर्चा रंगली. या चर्चेदरम्यान राज यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला. या नोटीसमध्ये राज यांना चौकशीला बोलणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव राणा बॅनर्जी असल्याचे दिसत होते. त्यांच्या सहीनेच ही नोटीस राज यांना आली होती.

राज यांना पाठवलेल्या नोटिसीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी फेसबुक आणि ट्विटवर राज यांना चौकशीसाठी बोलवणारा हा अधिकारी आहे तरी कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फेसबुक अकाऊंट सापडले. मात्र राज यांच्या चौकशीच्या दिवशी सकाळपर्यंत दिसणारे राणा यांचे फेसबुक अकाऊंट अचानक गायब झाले. या फेसबुक प्रोफाइलवर राणा हे ‘ईडी’मध्ये काम करत असल्याचे दिसत होते. तसेच त्यांच्या फ्रेण्डलीस्टमधील अनेकजण ईडीमध्ये काम करत असल्याचे दिसत होते. अनेकांनी राणा यांनी लाईक केलेल्या पेसेजचा स्क्रीनशॉर्टही व्हायरल केला. यामध्ये अमित शाह या एकमेव राजकारण्याचे पेज राणा यांनी लाईक केल्याचे स्क्रीनशॉर्टसहीत ट्विटवर व्हायरल झाल्याचे दिसले. अनेक राज समर्थकांनी यावरुन राणा यांचा थेट भाजपशी संबंध असल्याची टीका करत ट्विटवर यासंदर्भात पोस्ट केले. काही वृत्तवाहिन्यांनी या व्हायरल स्क्रीनशॉर्टबद्दल बातमी दिल्यानंतर फेसबुकवर राणा यांचे अकाऊंट दिसणे बंद झाले. हे अकाऊंट राणा यांनी डिअॅक्टीव्हेट केल्याची शक्यता नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मनसेच्या अनेक समर्थकांनी आणि राज ठाकरेंच्या चाहत्यांनी यासंदर्भात ट्विटवर अनेक पोस्ट केल्या आहेत.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

दरम्यान, कालच्या चौकशीसंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ तासांच्या चौकशीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज यांचा जबाब नोंदवून घेतला. भूखंड खरेदी, खासजी संस्थेकडून घेतलेले कर्ज, माघार, खासगी संस्थेची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष मिळालेला फायदा आधी व्यवहारांबाबत ईडीने राज यांना प्रश्न विचारले.