तुम्ही सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत सक्रिय असाल तर तुम्ही या अंड्याच्या फोटोशी चांगलंच परिचित असाल. हे साधसुधं अंडं नसून सोशल मीडियावरचं सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेलं ‘सेलिब्रिटी अंड’ आहे. या अंड्यानं कायली जेनर सारख्या इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सेलिब्रिटीचा रेकॉर्ड मोडला. एका अंड्याचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट तयार कसं झालं? या अंड्यानं कायलीचा विक्रम मोडला कसा? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले. या अकाऊंटमागचा मेंदू नक्की कोणाचा हे जाणून घेण्याचं कुतूहल जगभरातील नेटकऱ्यांना होतं. आता यावरुन पडदा उठला आहे. ‘वर्ल्ड रेकॉर्ड एज’ या सोशल मीडियवर चर्चेत असलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमागे एका १९ वर्षीय भारतीय तरूणाचा मेंदू आहे.

इशान गोयल या मार्केटिंग गुरूनं ‘वर्ल्ड रेकॉर्ड एग’हे पेज ४ जानेवारीला सोशल मीडियावर सुरू केलं. अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स इथल्या एका कंपनीत इशान मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहतो. काही दिवसांपूर्वी त्यानं अंड्याचा फोटो शेअर करत या फोटोला सर्वाधिक लाइक्स मिळवून द्या असं आवाहन त्यानं नेटकऱ्यांना केलं होतं. तसंच हे लाइक्स कायली जेनरच्या फोटोचा विक्रम मोडण्याएवढे हवेत असंही त्यानं पोस्ट मध्ये म्हटलं होतं. अल्पवधीतच या अंड्याच्या फोटोला ५ कोटींहून अधिक लाइक्स मिळाले. यापूर्वी कायली जेनरच्या फोटोला इन्स्टाग्रमावर सर्वाधिक म्हणजे तब्बल १ कोटी ८४ लाखांहून अधिक लाइक्स होते. तिचा फोटो २०१८ मधला इन्स्टाग्रामवरचा सर्वाधिक लाइक्स असलेला हा फोटो ठरला होता. मात्र या अंड्यानं तो विक्रम मोडला.

https://www.instagram.com/p/BsOGulcndj-/

‘यासर्वात त्या कोंबीडीचं सर्वात जास्त श्रेय आहे. खूप कमी वयात सोशल मी मीडियावर सक्रिय झालो त्यामुळे सहज प्रयोग करून पाहिला’ असंही इशान म्हणाला. इशाननं सुरू केलेल्या या अकाऊंटचे इन्स्टाग्रामवर तब्बल ८५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहे.