शार्क माशाचं नाव ऐकल्यानंतर लहान मुलांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र, ऑस्ट्रेलियातील आठ वर्षाच्या मुलाने चक्क ३१४ किलो वजनाचा शार्क मासा पकडला आहे. जेडन मिलौरो असं त्या आठ वर्षीय मुलाचं नाव आहे.

जेडन मिलौरोच्या वडिलांनी सांगितले की, जेडन त्या दिवशी माझ्यसोबत मासे पकडण्यासाठी सिडनीच्या साऊथ कोस्टवर आला होता. बलाढ्य शार्कने बोटीचा पाठलाग केला. जेडनने त्याचवेळी शार्कवर लोखंडी हूक टाकून जाळ्यात अडकवलं. जेडनने ज्यावेळी शार्क माश्याला पकडलं त्यावेळी बोटीवर मासे पकडणारे तज्ज्ञ होते.

शार्क पकडण्यापूर्वी मी थोडासा घाबरलेला होतो. पण मी मनातून कधीच पराभव किंवा भीती वाटून दिली नाही. त्यामुळेच शार्क पकडू शकलो. ३१४ किलोचा शार्क समुद्राच्या तटावर नेहण्यात आला. माशाचं वजन केल्यानंतर नवीन विक्रम झाल्याचं समजले, असे जेडन म्हणाला.

दरम्यान, १९९७ मध्ये Ian Hisseyने 312 किलो वजनाचा शार्क मासा पकडला होता. हा विक्रम जेडन याने मोडीत काढला. जेडनचे वडील सिडनीमध्ये गेम फिशिंग क्लबचे सदस्य आहेत. जेडन वयाच्या दोन वर्षापासून मासे पकडण्यासाठी वडिलांसोबत जात आहे.