News Flash

Viral Video : यालाच तर प्रेम म्हणतात…

वृद्ध पत्नीला पाठीवरून त्याने सुरक्षित स्थळी नेले

प्रेमाला वयाची मर्यादा नसते, असं म्हटलं जातं. मात्र, हल्लीच्या जमान्यात अनेक नाती आणि संसार औटघटकेचा खेळ ठरतो. तर ज्यांच्याकडून आम्ही एकमेकांवरून प्रेम करतो असं दाखवण्याचा प्रयत्न होतो अशांच्या प्रेमाची व्याख्या फार फार तर एकमेकांसोबत सेल्फी काढून महागडं गिफ्ट देण्यापर्यंत मर्यादित असते. हा आता याला अनेक अपवादही आहेत. अशाच अनकंडिन्शल लव्ह प्रकारात मोडणाऱ्या एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खऱ्या प्रेमाची जाणीव करून देईल. आपल्या वृद्ध पत्नीला चालता येत नाही म्हणून तिच्या पतीने पूरातून वाट काढत तिला सुरक्षित ठिकाणी नेलं. पाठीवरून आपल्या पत्नीला नेतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चीनच्या व्हिबो या सोशल मीडिया साईटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 10:41 am

Web Title: elderly man carrying wife on back over puddle
Next Stories
1 बाईक स्टंट तर खूप पाहिलेत; पण ट्रॅक्टर स्टंट कधी पाहिलाय?
2 इतका सुंदर पांढरा जिराफ तुम्ही नक्कीच पाहिला नसेल!
3 मोदींच्या गुजरातमध्ये तिरंग्याचा अपमान; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X