23 November 2017

News Flash

Viral Video : ट्रेनमध्ये बसायला जागा देत नाही म्हणून पाहा आजीबाईंनी काय केलं

मानलं बुवा !

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 12, 2017 12:55 PM

हा सारा प्रकार सुरू असताना ट्रेनमधले प्रवासी मात्र ढिम्मपणे बसून होते.

ट्रेन किंवा बसमध्ये बसायला जागा मिळवण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो हे आपण भारतीय चांगलेच जाणतो. अगदी आपल्याकडे आसनांवरून मारामारी देखील होते. एवढंच कशाला लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा अनुभव रोजचाच. समोरचा व्यक्ती बसायला जागा देत नाही म्हणून त्याच्याशी जोरजोरात भांडायचं किंवा बाचाबाची करायची हे प्रकार आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. पण जागा मिळवण्यासाठी कोणताही वाद न घातला एका आजींनी जो गांधीगीरीचा मार्ग अवलंबला आहे तो पाहून या आजींना मानलं बुवा!

वाचा : त्या उपजिल्हाधिकारी ‘केबीसी’ खेळल्या, जिंकल्या आणि…

त्याचं झालं असं की ट्रेनमध्ये वृद्धांसाठी आरक्षित असलेल्या आसनावर एक तरूण बसला होता. जेव्हा आजींनी ही जागा आरक्षित असून ती तातडीनं रिक्त करण्याची विनंती तरुणाला केली. तेव्हा त्याने आजीबांईकडे साफ दुर्लक्ष केलं. वारंवार विनंत्या करूनही तो काही ऐकला नव्हता. तेव्हा आजींनी आपल्या स्टाईलनं हे प्रकरण हाताळायचं ठरवलं. त्याची खोड मोडण्यासाठी आजीबाईनं चक्क त्याच्या मांडीवर बसून प्रवास केला. विशेष म्हणजे हा सारा प्रकार सुरू असताना ट्रेनमधले प्रवासी मात्र ढिम्मपणे बसून होते.

वाचा : स्वखर्चाने खड्डे बुजवणाऱ्या अवलियाला सेहवागचा सलाम

First Published on September 12, 2017 12:52 pm

Web Title: elderly woman sat on young man lap who refused to vacate reserved seat