News Flash

Video : शक्ती की युक्ती? जेव्हा खाण्यासाठी हत्तींमध्ये लढाई होते…

व्हिडीओ तुम्ही पाहातच राहाल

Video : शक्ती की युक्ती? जेव्हा खाण्यासाठी हत्तींमध्ये लढाई होते…

सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. त्यात हत्तींच्या व्हिडीओला जास्त पसंती दर्शवली जाते. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर हत्तींचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. कधी रस्त्याच्या बाजूला जाताना, कधी खेळताना, कधी फुलपाखरांचा पाठलाग करताना तर कधी करामती करताना तर कधी हत्तीचं रौद्र रुप दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण आपापसांत हत्तींचा कधी वाद पाहिलाय का? होय असा दुर्मिळ व्हिडीओ सध्यो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तीन हत्तींमध्ये खाण्यावरुन वाद झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शेल्ड्रिक यांनी या तीन हत्तींच्या वादाचा दुर्मिळ असा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. ते म्हणतात की, मैशा, रोहो आणि लारो या तीन हत्तींच्या पिल्लांचे खाण्यावरून भांडत आहेत. एका हत्तीनं तोंडात फांदी पकडली तर दुसऱ्यानं ती हिसकावण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या भांडणात तिसरा हत्ती पडला आणि मारामारी सुरू झाली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन हत्तींच्या वादात तिसऱ्या हत्तीचा फायदा झाला. दोन हत्तींचा फांदीवरील पाला खाण्यासाठी वाद लागला होता त्यात तिसरा हत्ती पडला आणि फांदीवरचा पाला खाऊन मोकळा झाला. या दुर्मीळ हत्तीच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. २६ सेकंदाच्या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 2:02 pm

Web Title: elephant calves fight for tasty branch in sheldrick wildlife nck 90
Next Stories
1 इंजिनिअरने नोकरी जाईल या भीतीमुळे केला ‘जिगोलो’ बनण्याचा प्रयत्न, पण…
2 दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोराला मालकाने पिझ्झा फेकून मारला अन्…
3 Viral Video: गायीला विकल्यामुळे बैलाने घातला गोंधळ, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलामुळे दोघांचं पुन्हा झालं मिलन
Just Now!
X