News Flash

कमालच झाली राव… चक्क हत्ती करतोय तेल लावून मालकाची मालिश; व्हिडीओ नेटकऱ्यांना भावला

व्हायरल झाला व्हिडिओ

हत्तीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या लोक प्रेमात पडले आहे. या व्हिडीओत हत्ती एका व्यक्तीची तेलानं मसाज करत असल्याचं पहायला मिळत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हत्ती आपल्या सोंडेनं त्या व्यक्तीच्या पाठीला तेल लावत आहे.

या व्हिडीओला राजीव अग्रवाल यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत हत्ती जमीनवर चटई टाकून आपल्या मालकाची मालिश करत आहे. हत्ती आपल्या मालकाला पाठीवर झोपवतो. त्यानंतर सोंडेनं त्याच्या पाटीवर तेल लावतो आणि आरामात मसाज करत आहे. राजीव अग्रवाल यांनी व्हिडीओ शेअर करताना त्याला ‘हाथी मेरे साथी’ असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हत्तीच्या कौशल्याच्या प्रेमात पडले आहेत.

दोन मिनिटांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावला आहे. व्हिडीओच्या सुरुवातील तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती स्कूटीवर बसलेला आहे. आपल्या मालकाला हेल्मेटशिवाय जाताना पाहून हत्तीनं हेल्मेट त्याच्या डोक्यावर ठेवलं. त्यानंतर व्हिडीओमध्ये पुढे तो व्यक्ती बास्केटबॉल खेळतोय. पण त्याचा बॉल काही केल्या बास्केटमध्ये जात नाही. त्यावेळी हत्ती त्याला अलगद आपल्या सोंडेवर उचलतो आणि बास्केटमध्ये बॉल फेकण्यास सांगतो. या व्हिडीओत तुम्ही त्यानंतर त्या व्यक्तीची मालिश करताना आपण पाहू शकतो. इतकेच नव्हे तर आंघोळीलाही तो हत्ती मदत करतोय.

या व्हिडीओला सोशल मीडियावर पंसद केलं जातेय. आतापर्यंत या व्हिडीओला नेटकऱ्यांनी ११ हजार पेक्षा जास्त वेळा पाहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 4:03 pm

Web Title: elephant giving a massage to its human friend video goes viral on social media nck 90
Next Stories
1 थरार…! धावत्या ट्रेनसमोरुन मुलांनी घेतल्या पूर आलेल्या नदीत उड्या, मग…
2 Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम…
3 सच्चा पोलीस अधिकारी ! ड्युटी संपल्यावरही होतकरु विद्यार्थ्याला करतोय अभ्यासात मदत
Just Now!
X