20 September 2020

News Flash

Free America Now : इलॉन मस्कने केली ‘लॉकडाउन’ हटवण्याची मागणी !

"Free America Now : नागरिकांना त्यांचं स्वातंत्र्य पुन्हा बहाल करा"

ख्यातनाम तंत्रज्ञ आणि ‘टेस्ला’ या आघाडीच्या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी करोना व्हायरसमुळे अमेरिकेत लागू असलेल्या लॉकडाउनचा विरोध दर्शवलाय. “Free America Now” (अमेरिकेला मुक्त करा) असे ट्विट करत जवळपास एका महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाउन हटवण्याची मागणी मस्क यांनी केली आहे.

लॉकडाउनला विरोध दर्शवताना इलॉन मस्क यांनी काही ट्विट केले आहेत. ‘टाळेबंदी केल्यास करोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत फारसा फरक पडत नाही’, या आशयाच्या ‘वॉल स्ट्रिट जर्नल’च्या एका लेखाच्या आधारे इलॉन मस्क यांनी, “नागरिकांना त्यांचं स्वातंत्र्य पुन्हा बहाल करा” असं ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

याशिवाय, Bravo Texas! असे म्हणत मस्क यांनी, टेक्सासमध्ये शुक्रवारपासून अनेक व्यवहार पुन्हा सुरू होणार असल्याचं स्वागत केलं आहे. अन्य एका ट्विटमध्ये मस्क यांनी, दुसऱ्या एका ट्विटर युजरच्या मताशी सहमती दर्शवत, “निर्बंध हटवल्यानंतर सर्व खबरदारी घ्यायला हवी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायला हवं. पण, लोकांना घरांमध्ये लॉक करु नये” असे म्हटले आहे.

मस्क यांनी लॉकडाउनला विरोध केल्यानंतर आता त्यांच्या ट्विटवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2020 12:44 pm

Web Title: elon musk joins coronavirus lockdown rebels tweets free america now sas 89
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘व्हाइट हाउस’ने पंतप्रधान मोदींना अचानक केले ‘अनफॉलो’, राहुल गांधी म्हणतात…
2 माकडांनाही समजलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व… अन् मानवाला…?
3 Video: जेव्हा एकटा जिराफ सहा सिंहांशी भिडतो; पाहा पुढे काय होतं…
Just Now!
X