18 October 2019

News Flash

रंगिल्या जोडप्याचा टेस्ला कारनामा

त्यामुळेच या गाड्यांच्या मागणीत वाढ झाल्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

टेस्ला आणि एलॉन मस्क ही दोन नावे सध्या जगभर गाजत आहेत. विजेवर चालणारी कार बनवण्याची कल्पना मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात आणली ती टेस्ला या कंपनीने. अमेरिकन रस्त्यांवर टेस्ला कंपनीच्या मोटारी धावू लागल्या आहेत. अमेरिकेत या मोटारींना इतकी मागणी आहे की कारखाने २४ तास सुरू ठेवूनसुद्धा ती पूर्ण करणं कंपनीला जड जात आहे. सध्या अमेरिकेमध्ये या कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेष म्हणजे या मागणीमागील कारणं समजलं तर तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. सध्या टेस्ला मोटारीमधील एक सेक्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यामुळेच या गाड्यांच्या मागणीत वाढ झाल्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

चालक नसलेल्या चालत्या कारमध्ये प्रियकरासोबत सेक्स करणाऱ्या एका तरूणीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ टेस्ला कंपनीच्या कारमध्ये शूट करण्यात आला होता. या मुलीने शरीर संबंधादरम्यान गाडी ऑटो मोडमध्ये ठेवली होती. त्यामुळे चालक नसतानाही ती गाडी इच्छित स्थळाच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिआवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेलर जॅक्सन यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.


या व्हिडिओमध्ये आजूबाजूने अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहेत. चालत्या कारमध्ये सेक्स करण्याची इच्छा तरूणीच्या मनात निर्माण होते. मग ती आपल्या बॉयफ्रेंडला गाडी ऑटोमोडमध्ये टाकण्यास सांगते आणि तिची शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा पूर्ण करून घेते. “माझी शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा टेस्ला कारने पूर्ण केली, त्यामुळे मी या कारचे आभार मानते”, असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अमेरिकेत विजेवर चालणाऱ्या ऑटो मोड गाड्यांची चलती आहे. यापुढे गाडी चालवण्यासाठी चालकांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये यासाठी अशा प्रकारच्या गाड्यांची निर्मिती करण्यात येत आहे. एका टेस्ला कारची किंमत ५५ ते ८० लाख रूपये आहे.

First Published on May 15, 2019 3:51 pm

Web Title: elon musk under fire for tweets on tesla sex video