England Vs Pakistan 2nd T20 : इंग्लड आणि पाकिस्तानमध्ये (Eng Vs Pak) मॅनचेस्टर येथे दुसरा टी-२० सामना झाला. अटीतटीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने पाहुण्या पाकिस्तान संघाचा पाच विकेटने पराभव केला. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसरा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-०ची आघाडी घेतली. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन या सामन्याचा हिरो राहिला. मॉर्गनने झटपट ६६ धावांची खेळी केली. मॉर्गनने इंग्लडला सामना जिंकून दिला असला तरी सामन्यानंतर चर्चा मात्र पाकिस्तानच्या कर्णधाराचीच झाली.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) ने ५६ धावांची खेळी केली. आदिल रशीद (Adil Rashid) च्या गोलंदाजीवर तो बाद झाला. षटकार ठोकण्याच्या नादात आजम बाद झाला. बाबर आजमने रशीदच्या गोंलदाजीवर मोठा फटका मारला खरा पण सॅम बिलिंग्सने (Sam Billings) अफलाचून कॅच पकडला. झेलबाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजमला राग अनावर आला. त्यानं आपली बॅट जोरात जमिनीवर आदळली आणि मैदानाबाहेर गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल होत आहे.

पाकिस्तानने १२ षटकात एक विकेटच्या बळावर ११२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम मैदानावर तळ ठोकून होता. इंग्लडलाही माहित होत आपल्याला सामना जिंकण्यासाठी आणि धावसंख्या रोखण्यासाठी बाबर अजमची विकेट महत्वाची आहे. त्यादरम्यान आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाबरने विकेट फेकली… विकेट गेल्यानंतर बाबर आजमलाही आपली चूक लक्षात आली…. पण तोपर्यंत उशीर झाला होता. बाबर आजमने मैदानावर बॅट आदळत आपला राग व्यक्त केला…

पाहा Video :

 

बाबर आझम, मोहम्मद हाफीज यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला २० षटकात १९६ धावांचे आव्हान दिले होते. इयॉन मॉर्गन आणि डेव्हिड मलान यांच्या धडाकेबाज खेळींच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या षटकात विजय मिळवला. मॉर्गन ६६ धावांवर बाद झाला, पण मलान ५४ धावा करून नाबाद राहिला. ३३ चेंडूत ६६ धावा ठोकणाऱ्या मॉर्गनला सामनावीर घोषित करण्यात आले.