07 December 2019

News Flash

इंग्लंडची क्रिकेटपटू सारा ट्रेलरचं ‘बोल्ड’ पाऊल, जनजागृतीसाठी केलं विवस्त्र फोटोशूट

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला फोटो

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सारा टेलर आपल्या चपळ यष्टीरक्षणासाठी ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजेच्या वेगाने यष्टीचीत करण्यासाठी सारा ओळखली जाते. धोनीप्रमाणेच साराचेही यष्टीरक्षण करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सारा आपल्या यष्टीरक्षणामुळे नाही, तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा विवस्त्र फोटो शेअर केला आहे. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी सारा टेलरने हे फोटोशूट केलं आहे.

“अशाप्रकारे फोटोशूट करणं हे माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेरचं आहे. पण एका चांगल्या कारणासाठी मी हे करतेय. इतर महिलांप्रमाणेच मलाही स्वतःच्या शरिराबद्दल तक्रार करत राहण्याची सवय होती, मात्र मी त्यातून बाहेर पडले आहे. प्रत्येक मुलगी ही दिसायला सुंदरच असते.” आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साराने हा खास संदेश लिहीला आहे.

First Published on August 14, 2019 9:57 pm

Web Title: england womens cricket team wicket keeper sara taylor posted her nude photo in instagram psd 91
Just Now!
X