नोव्हेंबर महिना आल्यावर दोन गोष्टींची चाहूल लागते. पहिली म्हणजे थंडी आणि मागील काही वर्षांपासून चाहूल लागते ती ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची. परदेशाप्रमाणे आपल्या देशामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये दाढी न करण्याचा ट्रेण्ड वाढताना दिसत आहे. भारतामध्ये समाज माध्यमांचा वापर मागील काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच परदेशातील अनेक कल्पना या समाज माध्यमांवरून व्हायरल होऊन आपल्याकडे येते. या कल्पना येथे रुजतात आणि वाढतात. इंटरनेटमुळे अशा अनेक कल्पनांची देवणघेवणा अगदी सहज होताना दिसत आहे. मागील काही वर्षांपासून सात्यत्याने अशीच वाढत गेलेली संकल्पना म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर’.

सामान्यपणे आपल्याकडे समाज माध्यमांवर एखादी गोष्ट व्हायरल झाली की तो ट्रेण्ड फॉलो केला जातो. मात्र त्यामागील मूळ उद्देश काय आहे हे खूपच कमी जणांना ठाऊक असते. वास्तविक ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक व्हायरल ट्रेण्ड नसून ती एक सामाजिक मोहीम आहे. परदेशात मागील अनेक वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. यामागे पुरुषांचे आरोग्य आणि खास करून प्रोस्टेट कॅन्सरबद्दल जगरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे.

Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
venus planet transit in mee shukra transit in pisces these zodiac sign will be success all sector
शुक्र २४ एप्रिलपर्यंत मीन राशीत राहील विराजमान, ‘या’ तीन राशी होणार मालामाल?
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव

‘नो शेव्ह नोव्हेंबर’चा इतिहास

१९९९ साली ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील काही तरुणांनी एकत्र येऊन कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेचा मुख्य हेतू असा होता की कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केस गळू लागतात. तर चेहऱ्यावर वाढणाऱ्या केसांसाठी खर्च होणारे पसे एक महिनाभर बाजूला टाकून ते कॅन्सरसंदर्भातील मोहिमेला दान करायचे. हे पैसे कॅन्सरग्रस्तांना आणि पुरुषांना होणाऱ्या आजारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांना दान करण्याच्या हेतूने ही मोहीम राबवली जाते. चेहऱ्यावरील केस महिन्याभरासाठी वाढू देऊन प्रतीकात्मकतेच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानभूती व्यक्त करण्याच्या या प्रयत्नाला २००४ पासून मोव्हेंबर हे नाव देण्यात आले. यातलं मो म्हणजे मुस्टॅचेस म्हणजेच मिशा आणि व्हेंबर हे नोव्हेंबर महिना दर्शवणारे शब्द एकत्र करून हा शब्द शोधण्यात आला. या मोहिमेने कॅन्सरच्या रुग्णांबरोबरच पुरुषांच्या वाढत्या आत्महत्यांसंदर्भातही काम सुरू केले. या मोहिमेसंदर्भातील सर्व माहिती no-shave.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मात्र अनेकांना हा खरा उद्देश ठाऊक नसला तरी इंटरनेटमुळे फॅशन ट्रेण्ड म्हणून ‘नो शेव नोव्हेंबर’ साजरा करणाऱ्यांची संख्या वाढलीय हे विशेष. आता या परदेशी श्रावणाची मज्जा सोशल मीडियावर अगदी डिसेंबपर्यंत टिकून राहील यात शंका नाही.

भारतातील समाज माध्यमांवर दर वर्षी या मोहिमेसंदर्भातील विनोद व्हायरल होतात. यामध्ये अगदी आता दिवाळीतील शेव खाता येणार नाही पासून ते दाढीनंतरचा म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीचा आणि दाढी वाढवल्यानंतरचा म्हणजे ३० नोव्हेंबरचा फोटो अशा अनेक पोस्ट व्हायरल होतात.

सामाजिक मोहिमांचा झाला ट्रेण्ड

अर्थ समजून न घेता फॉलो केली जाणारी ही काही एकमेव मोहीम नाही. मध्यंतरी डोक्यावर बर्फाचे पाणी ओतून घेणारे आइस बकेट चॅलेंज चांगलेच व्हायरल झालेले. मात्र या मोहिमेमागील मूळ उद्देशाला बगल देत मज्जा म्हणून अनेकांनी थंड पाणी डोक्यावर घेण्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केलेले. यात मग अगदी सामान्यांपासून ते क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठय़ा व्यक्तींचा समावेश होता. मुळात मेंदूसंदर्भातील एएलएस या आजारावर संशोधनासाठी निधीसंकलन करण्यासाठी ‘एएलएस आइस बकेट चॅलेंज’ची संकल्पना सुरू करण्यात आली होती. मात्र बादलीभर पाणी ओतून घेण्याच्या या ट्रेण्डमुळे अनेक नवीन आणि समाजोपयोगी ट्रेण्ड त्यानंतर आले हेही तितकेच खरे. म्हणजे राईस बकेट चॅलेंज म्हणजे गरिबांना एक बादली तांदूळ दान करणे किंवा बुक बकेट चॅलेंज म्हणजे एका बादलीत बसतील इतकी पुस्तके दान करण्यासारखे अभिनव उपक्रम अनेकांनी राबवले.

याचप्रमाणे २०१३ साली प्रोजेक्ट सेमिकोलन या मोहिमेचाही जन्म झाला. या मोहिमेअंतर्गत अनेकांनी शरीरावर सेमिकोलनचा टॅटू काढून घेणे अपेक्षित होते. या सेमिकोलनच्या माध्यमातून डिप्रेशन असणाऱ्यांना, मनात आत्महत्येचे विचार येणाऱ्यांना, स्वत:ला इजा करून घेण्याची वृत्ती असणाऱ्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून प्रेम आणि सद्भावना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा या मोहिमेचा हेतू होता.

सामाजिक भान जपणाऱ्या अशा अनेक गोष्टी वारंवार व्हायरल होत असतात, मात्र दुर्दैवाने आधी त्या व्हायरल होतात आणि मग त्यामागील कारण लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळेच आधी मोहिमेचा हेतू लोकांपर्यंत पोहोचवून त्यानंतर ती व्हायरल केल्यास जास्तीत जास्त गरजूंना तिचा फायदा होईल.

(सौजन्य: लोकप्रभाच्या ३ नोव्हेंबर २०१७मधील अंकातून)