26 February 2021

News Flash

…छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासही चुकीचा ठरवला! विरेंद्र सेहवागचा मानाचा मुजरा

"इतिहास सांगतो की, सामर्थ्यवान लोकं एखाद्या शक्तिशाली ठिकाणाहून येतात. पण इतिहास चुकीचा होता... "

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी देशासह राज्यभरात उत्साहात साजरी झाली. विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि जय भवानी, जय शिवरायच्या जयघोषात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू अशा जवळपास सर्वच स्तरातील मंडळींनी छत्रपतींना अभिवादन केले. आपल्या हटके ट्विटसाठी नेहमीच चर्चेत असलेला भारताचा माजी धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवागनेही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती सांगणारं खास ट्विट केलं. त्याचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

शिवरायांचा अश्वावर आरुढ झालेला एक फोटो सेहवागने ट्विट केला आहे. या फोटोसोबत, “इतिहास सांगतो की, सामर्थ्यवान लोकं एखाद्या शक्तिशाली ठिकाणाहून येतात. पण इतिहास चुकीचा होता!… सामर्थ्यवान लोकांमुळे काही ठिकाणं शक्तिशाली बनतात”, अशा शब्दांमध्ये सेहवागने शिवाजी महाराजांची महती सांगितली आहे. यासोबतच, “छत्रपती शिवरायांना माझं वंदन… जय माँ भवानी”, अशी घोषणाही सेहवागने शिवजयंतीनिमित्त ट्विटमधून दिली.


सेहवागचं हे ट्विट शिवप्रेमींच्या चांगलंच पसंतीस पडलं असून हजारो जणांनी त्याचं हे ट्विट लाइक व रिट्विट केलं आहे. सध्या त्याचं हे ट्विट बरंच व्हायरल होतंय. दरम्यान, शुक्रवारी किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 10:34 am

Web Title: ex indian cricketer virendra sehwag tributes chhatrapati shivaji maharaj on his jayanti sas 89
Next Stories
1 Video: चाकांऐवजी ब्लेडवर चालणारी सायकल… ही भन्नाट सायकल कोणी आणि का बनवलीय जाणून घ्या
2 Video : 3000 डायनामाइट लावून ‘धोकादायक’ Trump Plaza केला जमीनदोस्त, पत्त्यांप्रमाणे कोसळली टोलेजंग इमारत
3 टॅक्सी ड्रायव्हरने सात तास ‘डाराडूर’ झोप काढून कमवले तब्बल 11 लाख रुपये, Video व्हायरल!
Just Now!
X