News Flash

सहा वर्षांचे ‘पांडेजी’ लग्नासाठी शोधतायेत मुलगी! माजी नेव्ही अधिकाऱ्यांनी मोदींसोबत शेअर केला व्हिडिओ; म्हणाले…

"विवाहयोग्य वयामध्ये बदल करण्याची मागणी लवकरच तुमचा दरवाजा ठोठावेल असं दिसतंय"

सोशल मीडिया सध्या मनोरंजनाचं प्रमुख साधन बनलं आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवर दररोज नवनवे फनी व्हिडिओ शेअर होत असतात. काही व्हिडिओ पाहून हसू अनावर होतं तर असेही अनेक व्हिडिओ असतात जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडिओ चांगलाच गाजतोय. व्हिडिओमध्ये अवघ्या सहा वर्षांचा आयुष पांडे आईसोबत चक्क स्वतःच्या लग्नाबाबत चर्चा करताना दिसतोय.

माजी नौदल अधिकारी हरिंदर सिक्का यांनी हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना सिक्का यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं असून, ‘विवाहयोग्य वयामध्ये बदल करण्याची मागणी लवकरच तुमचा दरवाजा ठोठावेल असं दिसतंय’, अशा आशयाचं मजेशीर ट्विट केलं आहे. व्हिडिओमध्ये सहा वर्षांचा आयुष पांडे त्याच्या आईकडे लग्न लावून द्या असं म्हणतोय. लग्न झाल्यामुळे एक पार्टनर भेटेल, ती आईची कामात मदत करेल, शिवाय त्याच्यासोबत गेमही खेळेल असं तो म्हणतोय. तसेच सध्या तीन जणांचं कुटुंब आहे ते लग्नानंतर चार जणांचं होईल, पत्नीसोबत लपाछपी खेळेन, कुटुंबात अन्य सदस्य नसल्याने लपाछपी खेळता येत नाही, असं तो व्हिडिओत बोलताना दिसतोय. त्याच्या निरागसपणावर आईलाही हसू येतं पण मुद्दाम प्रश्न विचारुन ती आपल्या लहानग्याला बोलतं करते आणि त्याचं सर्व म्हणणं आई फोनमध्ये रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर पोस्ट करते.

सध्या सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 9:26 am

Web Title: ex navy officer harinder sikka shares video of six year old pandey looking for a girl for marriage tags pm modi also sas 89
Next Stories
1 Viral Video : नाद खुळा… शेतकऱ्याची ट्रॅक्टर व्हीली पाहून थक्क व्हाल
2 Video : …म्हणून त्याने ३०० किमीहून अधिक अंतर ट्रॅक्टर Reverse Gear मध्ये चालवत केलं पार
3 Video : बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना लागली वाळवी; दोन लाख किंमतीच्या नोटा फस्त
Just Now!
X