पती कौशल स्वराज यांच्या दीर्घ आयुष्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील ‘करवा चौथ’चा उपवास केला. महाराष्ट्रात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला वट पौर्णिमेचा उपवास करतात. तर उत्तर भारतातील राज्यांत कोजागिरी पौर्णिमेनंतर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला करवा चौथचे व्रत करतात. या दिवशी दिवसभर पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळी उपवास करते. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीची पूजा करून पत्नी व्रताची सांगता करते. सुषमा स्वराज यांनीदेखील करवा चौथचा उपवास केला होता.

रविवारी संध्यांकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी व्रताची सांगता केली. पूजेसाठी त्यांच्यासोबत इतर महिलाही त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या. लाल रंगाची साडी आणि इतर साज-शृंगारात त्या फारच सुंदर दिसत होत्या. स्वराज यांचे पती मिझोरामचे माजी राज्यपाल आहेत. पराराष्ट्र मंत्रालयाचा कारभार सांभाळायला सुरुवात केल्यापासून पतीसोबत फार कमी वेळ घालवता येतो, अशी खंतही त्यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. सुषमा स्वराज आणि कौशल स्वराज हे दाम्पत्य सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. दोघांचाही हजरजबाबीपणा, कौशल यांचा मिश्किल स्वभाव विनोदीशैली आणि तितकाचा सडेतोडपणा सगळ्यांना भावतो. त्यामुळे हे दाम्पत्य सगळ्यांच्या विशेष आवडीचे आहे. सुषमा स्वराजच नाही तर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी देखील करवा चौथ साजरा केला.

बापरे! ऑस्ट्रेलियात खाट आयफोनपेक्षाही महाग

‘करवा चौथ’ची कथा
करवा चौथच्या अनेक कथांपैकी एक दंतकथा विशेष प्रसिद्ध आहे. सात भावांची आवडती आणि एकुलती एक बहिण वीरावती ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास ठेवते. चंद्राचे दर्शन होत नसल्याने तिला आपला उपवास सोडता येत नाही. त्यामुळे अन्न पाण्यावाचून तिष्ठत असलेल्या आपल्या बहिणीला पाहून या सातही भावांना दु:ख होते. जोपर्यंत चंद्र दर्शन होणार नाही तोपर्यंत वीरावती अन्नग्रहण करणार नाही हे त्यांना चांगलेच ठावूक असते. त्यामुळे शक्कल लढवून ते वीरावतीला उपवास सोडायला भाग पाडतात. घराशेजारी असणा-या झाडावर गोलाकार आरसा ठेवून तो चंद्र आहे असे सांगत तिचे सातही भाऊ तिला उपवास सोडायला भाग पाडतात. भावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत वीरवती देखील आपला उपवास सोडते. पण ख-या चंद्राचे दर्शन न घेता व्रताचा नियम मोडल्यामुळे तिचा पती मरण पावतो. भावांकडून फसवले गेल्यामुळे आणि पतीचा मृत्यू झाल्यामुळे दु:खी झालेली वीरावती अश्रू ढाळत बसते. अशावेळी देवी तिथे प्रकट होते. रडणाऱ्या वीरावतीला दु:खाचे कारण विचारते. तेव्हा वीरावती सगळी कहाणी सांगते. वीरावती आणि तिच्या भावाकडून अनावधानाने झालेली चूक लक्षात घेता देवी तिला पुन्हा उपवास करायला सांगते आणि वीरावतीचा पती पुन्हा जिवंत होतो.

आता विश्वास ठेवायचा कोणावर? वेश बदलून फावल्या वेळेत पोलीस अधिकारी करायचा चोरी!