इमोजी आल्यानंतर संवादाची भाषाच जणू बदलली. शब्दांची जागा हळूहळू इमोजी घेऊ लागले. इमोजीमुळे आपले संवाद साधणे किती सोपे झाले. आजकाल शब्दांपेक्षाही इमोजींचा जास्त वापर केला जात आहे. इमोजींमुळे संवाद अधिक बोलका होतो असे संशोधनातून समोर आले आहे. इमोजीं संवादात आले तर नेमके समोरच्या व्यक्तीला काय बोलायचे आहे हे देखील पटकन कळून येते म्हणूनच संवादात इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

वाचा : इमोजींचा अर्थ सांगा अन् नोकरी मिळवा!

नुकतेच एक संशोधन प्रकाशित करण्यात आले. इमोजींवर आधारित ते संशोधन होते. मिशिगन विद्यापीठ आणि चीनमधल्या विद्यापीठाने एक मिळून काही आकडेवारी गोळा केली. कोणत्या इमोजींचा सर्वाधिक वापर केला जातो यावर हे संशोधन होते. यासाठी त्यांनी २१२ देशांतील ४० लाखांहून अधिक स्मार्टफोनमधील मेसेजेवर संशोधन केले. यानुसार ‘फेस विथ टियर्स ऑफ जॉय’ या इमोजीचा जगात संवाद सधताना सर्वाधिक वापर केला जात असल्याचे म्हटले आहे.

वाचा : मुलांच्या ‘या’ गोष्टींवर मुली होतात फिदा!

फेस विथ टियर्स ऑफ जॉय
मिशिगन विद्यापीठाच्या संशोधनानुसार जगभरात फेस विथ टियर्स ऑफ जॉय या इमोजीचा सर्वधिक वापर केला जातो. जगातील १५ टक्के टक्के लोक या इमोजीचा सर्वाधिक वापर करतात. २०१५ मध्ये ऑक्सफोर्ड शब्दकोशात त्याचा समावेश करण्यात आला.

main-qimg-0b5a27e5cd9dd229f6dd971b71844465-c
हार्ट
फेस विथ टियर्स ऑफ जॉय नंतर हृदयाच्या आकाराच्या इमोजीचा सर्वाधिक वापर केला जातो. सर्वाधिक इमोजी वापरण्यात महिला अव्वल असून जगातील ६८ टक्के महिला इमोजींचा वापर करतात.

img-thing
स्मायलिंग विथ हार्ट शेप आइज
तिसरा क्रमांक या इमोजीचा लागतो. जरी इमोजीचा सर्वाधिक वापर महिलांकडून होत असला तरी जगातील फक्त ३२ टक्के पुरूष हे इमोजींचा वापर करणे पसंत करतात.

1448096698smile2
फेस ब्लोविंग किस
या संधोधनात हा इमोजी चौथ्या क्रमांकावर आहे. इमोजी वापरणारे ७४ टक्के युजर्स हे २५ वर्षाखालील आहेत.

da8b02ef00a0b3eeb7f02bf713234cbf
स्मायलिंग फेस विथ स्मायलिंग आय
स्मायलिंग फेस विथ स्मायलिंग आय हा इमोजी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, चेक रिपब्लिकचे लोक साधारणत या इमोजींचा सर्वाधिक वापर करतात.

emoji-20x20cm-whatsapp