उपांत्य सामन्यात मोक्याच्या क्षणी एम.एस धोनी धावबाद झाला. धोनी बाद झाल्यानंतर सर्वांनाच दुख: झाले होते. धोनी बाद होताच संपूर्ण भारतामध्ये दुखा:चे वातावरण होतं. अनेकांना रडूही कोसळलं होतं. सोशल मीडियातूनही अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय संघ उपांत्य सामन्यातून बाद झाल्यानंतर धोनी आणि एका फोटोग्राफरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

या कोलाज फोटमध्ये धोनी बाद झाल्यानंतर फोटोग्राफरला रडू कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोच सर्वकाही सांगतो. एक फोटो हजार शब्दांच्या पुढे बोलतो, असेही कॅप्शन देण्यात आले. मात्र, तो फोटो भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील नसल्याचे सिद्ध झाले आहे. रडणाऱ्या फोटोग्राफरचा तो फोटो फुटबॉल सामन्यादरम्यानचा आहे. जानेवारीमध्ये झालेल्या आशियाई फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेदरम्यानचा हा फोटो आहे. या फोटोग्राफरचे नाव अल अजावी असून तो इराकचा नागरिक आहे.

या फोटोला गुगलवर सर्च केल्यास trollfootball.me या वेबसाइटवर प्रकाशित झालेली बातमी दिसून येते. २४ जानेवारी रोजी प्रकाशीत झालेल्या बातमींमध्ये हा फोटोग्राफर दिसतो. ‘Iraqi sports photographer crying after losing against Qatar in round of 16 of the Asian Cup’ या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित झाली होती.

या बातमीत असलेला फोटो सध्या वायरल होत आहे. तसेच AFC Asian Cup च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर २४ जानेवारी रोजी हा फोटो पोस्ट केल्याचे समोर आले आहे. कतारविरुद्धच्या सामन्यात इराकी फोटोग्राफर भावूक झाला असे ट्विटही या फोटोसह करण्यात आले. धोनी बाद झाल्यानंतर फोटोग्राफरला रडू कोसळलं नसल्याचे दिसून येते.