News Flash

Fact Check : पॉर्न साईटवरील बंदी केंद्र सरकारनं खरंच हटवली का?

ट्विटरवर ही बातमी व्हायरल झाली आहे.

केंद्र सरकारनं भारतात पॉर्न साईटवर बंदी घातलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर केंद्र सरकारनं देशात पॉर्न साईट बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, करोना व्हायरसचा देशभरात कहर सुरू असताना पॉर्न साईटवरील बंदी केंद्रानं हटवल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. मात्र, ही बातमी खोटी आहे.
देशात करोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. करोनाचा वेगानं होत असलेला प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडियात अफवांचे पेव फुटत आहे. त्यातच एक बातमी पॉर्न साईटवरील बंदी हटवल्याची आहे.

सत्य काय?

देशभरात पसरलेली एएनआय नावाची वृत्तसंस्था आहे. ही वृत्तसंस्था सर्व घडामोडींची माहिती ट्विटरवरूनही देते. याच वृत्त संस्थेच्या नावानं ट्विटर या सोशल साईटवर एक बनावट अकाऊंट तयार करण्यात आलेलं आहे. या अकाऊंटवरून हे पॉर्न साईटवरील बंदी हटवल्याचं वृत्त ट्विट करण्यात आलं आहे. ‘देशात उद्भवलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पॉर्न साईटवरील बंदी हटवली आहे. लवकरच यासंदर्भातील अधिसूचना सरकारच्या गॅझेटमधून प्रसिद्ध होणार आहे,’ असं वृत्त त्यावर ट्विट करण्यात आलेलं आहे. मात्र, असा कोणताही निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला नाही.

पॉर्न हब देणार मोफत कंटेट –

चीनसह जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूमुळे इटलीमध्ये एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा चीननंतर सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने पंतप्रधान गिसीपी काँटे यांनी सर्व देशामध्ये शटडाऊनची म्हणजेच बंद करण्याची घोषणा केली आहे. महत्वाचा प्रवास वगळता इतर प्रवासांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या इशाऱ्यांकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने सरकारे सक्तीची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे इटलीतील दोन तृतीयांश भागातील सहा कोटी जनतेला घरी बसण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाहीय. याच पार्श्वभूमीवर पॉर्न हब या पॉर्न वेबसाईटने इटलीमध्ये आपला प्रिमियम कंटेट मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यासंदर्भातील एक पत्रकच जारी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 7:19 pm

Web Title: fact check is it centre govt lift ban on porn site bmh 90
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 COVID-19: फेसबुक, नेटफ्लिक्स, Hotstar चा निर्णय, १४ एप्रिलपर्यंत केला मोठा बदल
2 मोटोरोला, सॅमसंगला टक्कर; आला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन
3 Covid 19: मदतीसाठी पुढे आली MG Motor, कंपनी देणार दोन कोटी रुपये
Just Now!
X