28 February 2021

News Flash

Fact check : राहुल गांधींनी खरंच सुशांत सिंहचा उल्लेख युवा क्रिकेटपटू असा केला का?

काय आहे व्हायरल झालेल्या ट्विट मागचं सत्य?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (१४ जून) मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विषयी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याचबरोबर श्रद्धांजलीही अर्पण केली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येविषयी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, राहुल गांधी यांनी सुशांत सिंह राजपूत याचा उल्लेख युवा क्रिकेटपटू केल्याच्या ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. त्यावरून अनेकांना प्रश्नही पडला आहे.

राहुल गांधी यांनी सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. त्याविषयी त्यांनी एक ट्विटही केलं होतं. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात राहुल गांधी यांनी सुशांतसिंहचा उल्लेख युवा व गुणवान क्रिकेटपटू असा उल्लेख केल्याचं दिसत आहे. हा स्क्रीनशॉट व्हॉट्स अॅप आणि इतर सोशल मीडियात पसरला आहे.

सत्यता काय आहे?

राहुल गांधींच्या व्हायरल करण्यात आलेल्या ट्विटमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. मुळात त्यांनी सुशांत सिंह राजपूत याचा उल्लेख युवा व गुणवान अभिनेता असा केलेला आहे. त्यांच्या मूळ ट्विट मध्ये तसा उल्लेख केला आहे. “सुशांत सिंह राजपूत याचं निधन झाल्याचं ऐकून वाईट वाटतंय. एक तरुण व हुशार अभिनेता खूप लवकर गेला. त्याचे कुटुंबीय, मित्र व जगभरातील चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे,” असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.

सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाविषयी सहवेदना व्यक्त करणाऱ्या राहुल गांधी यांच्या ट्विटमध्ये ही छेडछाड पहिल्यांदाच झालेली नाही. यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या मूळ ट्विटमध्ये छेडछाड करून ते सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 3:54 pm

Web Title: fact check is rahul gandhi mention sushant singh rajput as a cricketer bmh 90
Next Stories
1 “आपण झोपतो तेव्हा करोना विषाणूही झोपतो”; पाकिस्तानमधील धर्मगुरुचा अजब दावा
2 हा प्राणी कोणता? वन अधिकाऱ्याने दिलं चॅलेंज; उत्तर समजल्यावर व्हाल थक्क
3 गणित चुकलं… २०१२ नाही जून २०२० मध्ये होणार जगाचा अंत; तारीखही केली जाहीर
Just Now!
X