News Flash

Fact Check: आसाममधील डिटेंशन सेंटरमध्ये मुस्लिमांना मारहाण?; जाणून घ्या सत्य

सोशल मिडियावर मागील काही दिवसांपासून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

डिटेंशन सेंटरचा व्हिडिओ आसाममधील?

मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर आसाममधील स्थानबद्धता केंद्रामध्ये (डिटेंशन सेंटरमध्ये) मुस्लिमांना मारहाण झाल्याच्या कॅप्शनसहीत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये पोलीस काही कैद्यांना मारहाण करताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ आसाममधील नसून श्रीलंकेमधील असल्याचं स्पष्ट झालं आहे. श्रीलंकेतील तुरुंगातील पोलिसांच्या क्रौर्याचे दर्शन घडविणारी ११ महिने जुनी व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर आसामच्या नावाने व्हायरल होत आहे.

भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात मुस्लिमांना सापत्न वागणूक दिली गेल्याच्या कारणावरून डिसेंबरमध्ये संपूर्ण देशभरात आंदोलने झाली. अर्थात या आंदोलनात मुस्लिमांसह इतर अनेक पक्ष आणि संघटना आघाडीवर होत्या. सरकारचा निर्णय चुकीचा आहे, हे दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करणे, हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र हा विरोध करताना काही जणांनी सरकारने स्थानबद्धता केंद्र उभारून मुस्लीम नागरिकांना अमानुष मारहाण करीत असल्याचा खोटा दावा केला आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तो आसाममधील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओसोबत असलेल्या ओळीतल्या मजकुरात (कॅप्शन) आसाममधील स्थानबद्धता केंद्रात (डिटेंशन सेंटर) मुस्लिमांचा छळ करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मात्र अशी कोणतीही घटना या राज्यात घडलेली नाही. मागील काही दिवसांपासून श्रीलंकेमधील व्हिडिओ शेअर करुन ही घटना आसाममध्ये घडल्याचा दावा भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांकडून केला जात आहे.

सत्य काय?

वस्तुस्थिती अशी आहे की, श्रीलंकेतील अंगुनाकोलापेलेसा तुरुंगातील अधिकारी कैद्यांना ओणवे करून काठीने मारले जात आहे. १७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ८.५६ ते ९.१८ या वेळेत पोलिसांनी कैद्यांना मारहाण केली होती. तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पोलिसांचे हे क्रौर्य कैद झाले आहे. आता हाच व्हिडिओ आसाममधील असल्याचे सांगत चुकीच्या हेतूने व्हायरल केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 9:14 am

Web Title: fact check video from sri lanka shared as muslims beaten in a detention center in assam scsg 91
Next Stories
1 थर्टीफस्ट संपला, पण हँगओवरचं काय? पहा भन्नाट मीम्स
2 Heart Touching Video : दिव्यांग खेळाडुच्या जिद्दीनं सचिन तेंडुलकर गहिवरला
3 प्रवाशांना थंडी वाजू नये यासाठी रिक्षाचालकाने लढवली भन्नाट शक्कल
Just Now!
X