उपांत्य सामन्यात केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. या सामन्यात धोनीचं धावबाद होणं वादाचा मुद्दा ठरला होता. सामन्यानंतर सोशल मीडियावर धोनी धावबाद झाला तेव्हा सहा खेळाडू सर्कलच्या बाहेर होते आणि याला मैदानावरील पंचांनी डोळेझाक केल्याची चर्चा सुरु आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पंचांनी त्यावेळी आपली कामगिरी चोख बजावली असती तर धोनी धावबाद झाला नसता अन् भारताने न्यूझीलंडचा पराभव केला असता असे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊयात धोनी धावबाद झाला तेव्हा खरंच सहा खेळाडू सर्कलबाहेर होते का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ – 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सहा खेळाडू सर्कलबाहेर दिसत असले तरी प्रत्यक्ष मैदानावरील परिस्थिती वेगळी होती. विश्वचषकाचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीनं त्यावेळी चुकीचं फुटेज दाखवल्यामुळे हा सर्व वाद उद्भवला आहे. ४९ व्या षटकाच्या सुरूवातीला न्यूझीलंडचे पाच खेळाडू ( थर्ड मॅन, डीप फाईन लेग, डीप पॉईंट, डीप स्वेअर लेग आणि लाँग ऑन) सर्कल बाहेर होते. पहिल्याच चेंडूवर धोनीनं षटकार लगावला. पुढच्या चेंडूवर मिड विकेटच्या खेळाडूला मागे पाठवण्यात आले आणि डीप फाईन लेगवरी खेळाडूला जवळ बोलावण्यात आले. त्या चेंडूवर धोनीला धाव घेता आली नाही. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी टीव्ही स्क्रीनवर एक ग्राफीक दाखवण्यात आलं त्यात सहा खेळाडू सर्कल बाहेर दिसत होते. पण, तेव्हा थर्ड मॅनच्या पोझिशनमध्ये बदल करण्यात आला होता. त्यामुळे धोनी धावबाद झाला तेव्हा सर्कलच्या बाहेर सहा खेळाडू होते हे म्हणने चुकचं ठरू शकते.

सामन्याचे प्रेक्षपण करणाऱ्या विहनीकडून ही मोठी चूक झाली. त्यामुळे ही चर्चा रंगली आहे. काही क्रीडाप्रेमींनी याची आयसीसीला विचारणाही केली आहे. क्रीडा प्रेमींनी पराभव पचवून विजेत्या संघाचा विजय मान्य करावा. भारताचा पराभव करत न्यूझीलंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. १४ जुलै रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.