महाराष्ट्रात आता वयाची ५५ वर्षे पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन योजना म्हणून तीन हजार रुपये देण्यात येत आहेत. सोबत जी. आर. देत आहे. आपण आपल्या ओळखीच्या शेतकऱ्यांना ही माहिती द्याल ही विनंती, असे आवाहन असलेली एक ‘पोस्ट’ सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर ‘व्हायरल’ झाली आहे, पण हे चुकीचे आहे. हा जी. आर. (शासन ठराव) नाही. हे अशासकीय विधेयक आहे. त्याची फक्त विधिमंडळात चर्चा होते. मग ते मागे घेतले जाते. ही प्रथा आहे. काँग्रेसचे आमदार रामहरी रूपनवार यांनी ते मांडले होते.