कृपया तुमच्या मोबाइलवरील सर्व संपर्क क्रमांकांवर हा संदेश पाठवा. रस्त्यावरून चालणाऱ्या मुलाचे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कसे अपहरण केले आहे? असा संदेश सध्या व्हॉटस्अ‍ॅपवर ‘व्हायरल’ झाला आहे. परंतु तो खोटा आहे. व्हायरल झालेली ध्वनिचित्रफीत ही मुलांच्या अपहरणसंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ‘रोशनी हेल्पलाइन’ या संस्थेने २०१६ मध्ये तयार केली होती. ध्वनिचित्रफीत जिथे संपते तिथे एक संदेश हेल्पलाइनच्या वतीने देण्यात आला होता. तो असा की, पाकिस्तानातील कराची येथून दरवर्षी तीन हजार मुलांचे अपहरण केले जाते. त्यामुळे तुमच्या मुलावर नजर ठेवा’.