न्यूझीलंडचा प्रसिद्ध इन्स्टाग्राम स्टार जोसेफ रॅकिच याची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे आणि याचं कारणं आहे त्याचं हटके ‘प्रपोजल’. जोसेफनं आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली आहे. पण, एखाद्या परीकथेत शोभेल अशा पद्धतीनं त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. जवळपास साडेसात लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स असलेल्या जोसेफच्या प्रपोजलची सगळीकडेच चर्चा सुरू आहे.

न्यूझीलंडमधलं सर्वात मोठं स्टेडिअम त्यानं एक दिवसासाठी भाड्यानं घेतलं होतं. गर्लफ्रेंड मिमीला त्यानं गुलाबी रंगाची आलिशान गाडीही भेट म्हणून दिली. या सुखद धक्क्यातून मिमी सावरत नाही तोच हिऱ्याची अंगठी समोर ठेवत जोसेफनं तिला लग्नाची मागणी घातली. मिमीला तो चक्क  हेलिकॉप्टरमधून स्टेडिअमध्ये घेऊन आला होता.

एखाद्या राजकुमाराशी आपलं लग्न व्हावं अशी मिमिची इच्छा होती. जोसेफ खराखुरा राजकुमार नसला तरी एखाद्या राजेशाही थाटात त्यानं मिमीला लग्नाची मागणी घातली आहे. जोसेफनं याचे व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत जे सध्या खूपच व्हायरल होत आहे.