27 November 2020

News Flash

महिला क्रिकेटर प्रिया पुनियाला चाहत्याने विचारला बॉयफ्रेंडबाबत प्रश्न? रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

सोशल मीडियावर एका चाहत्याने बॉयफ्रेंडबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे प्रिया पुनिया चर्चेत

भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर प्रिया पुनिया हिचं नाव आता अनोळखी राहिलेलं नाही. वर्ष 2018 मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यापासून प्रिया पुनिया आपल्या शानदार कामगिरीमुळे चर्चेत राहिली आहे. मूळ राजस्थानच्या जयपूरची असलेली प्रिया या महिन्याच्या सुरूवातीला युएईच्या शारजामध्ये झालेल्या टी-20 चॅलेंजर टुर्नामेंटमध्ये मात्र आपली छाप पाडू शकली नाही, आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील त्यांच्या ‘टीम सुपरनोवा’ या संघाला अंतिम सामन्यात ‘ट्रेलब्लेजर्स’कडून पराभव पत्करावा लागला. पण आता प्रिया पुनिया सोशल मीडियावर एका चाहत्याने बॉयफ्रेंडबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे चर्चेत आहे.

व्हिडिओ शेअर करत दिली अशी रिएक्शन :-
प्रिया पुनियाने सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनमध्ये आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या दरम्यान तिच्या चाहत्यांनी विविध प्रश्नांची विचारणा केली. अशातच एका चाहत्याने, कोणी बॉयफ्रेंड आहे का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर प्रियाने दिलेलं उत्तर काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालं. प्रियाने त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या चेहऱ्यावरील हावभावांद्वारे प्रियाने बॉयफ्रेंडबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं असून हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. क्रिकेटर नसते तर बॅडमिंटन खेळाडू बनले असते असंही प्रियाने यावेळी एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. तसेच, आवडतं राजस्थानी खाद्य ‘चूरमा लड्डू’ असल्याचंही तिने सांगितलं.

Priya Punia’s reaction from TheCricketGuy on Vimeo.

24 वर्षाच्या प्रिया पुनियाचे इंस्टाग्रामवर जवळपास पाच लाख फॉलोअर असून, तरुणांमध्ये ती बरीच लोकप्रिय आहे. डावखुरी फलंदाज प्रिया पुनियाने आपल्या कारकिर्दित 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 2:19 pm

Web Title: fan asks priya punia if she has a boyfriend now her reaction is going viral on social media sas 89
Next Stories
1 कृतीमधून दाखवून दिलं… अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी रोहित पावर धावले
2 “नग्नतावादी आणि मास्क न घालणारे सारखेच, आपण एखाद्याला पॅण्ट घालायला सांगतो तेव्हा…”; बिल गेट्स संतापले
3 कुत्र्याचं नाव गोवा असं का ठेवलं?; रतन टाटांनी त्या कमेंटला दिला रिप्लाय
Just Now!
X