News Flash

वाढदिवशी झहीर खानला ट्रोल करणाऱ्या पांड्याची नेटकऱ्यांकडून खरडपट्टी

खुद्द झहीरनेही दिलं सडेतोड उत्तर

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. नुकतीच त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली. मात्र हार्दिकने अशा परिस्थितीतही नेटकऱ्यांचा रोष आपल्यावर ओढवून घेतला आहे. ७ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खानने आपल्या वयाची ४१ वर्ष पूर्ण केली. या दिवशी झहीर खानच्या सर्व चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र हार्दिक पांड्याने आपल्या जुन्या सामन्यात झहीर खानच्या गोलंदाजीवर षटकार मारतानाचा व्हिडीओ पोस्ट करत झहीरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

हार्दिक पांड्याचं हे ट्विट नेटकऱ्यांना अजिबात रुचलं नाही. नेटीझन्सनी यानंतर हार्दिक पांड्याची चांगलीच खरडपट्टी काढली.

यानंतर झहीर खाननेही पांड्याचे आभार मानत आपल्या खास शैलीत हार्दिकला सडेतोड उत्तर दिलं आहे.

पाठीला झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक उरलेलं वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाहीये. सध्या तो शस्त्रक्रियेमधून सावरण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हार्दिक भारतीय संघात कधी पुनरागमन करतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 10:39 am

Web Title: fans troll hardik pandya on his birthday wishes to zaheer khan later on zahher also hits back to pandya psd 91
टॅग : Hardik Pandya
Next Stories
1 अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची ‘छप्परफाड’ कमाई, सहा दिवसांत ‘इतक्या’ हजार कोटींची उलाढाल
2 ‘सॅमसंग’चा घडी घालता येणारा Galaxy Fold खरेदी करण्याची संधी
3 राष्ट्रवादी खासदाराच्या जेवणात आढळलं अंड्याचं कवच, एअर इंडियाकडून केटररला दंड
Just Now!
X