करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बसल्यामुळे पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेचे प्ले-ऑफचे सामने काही महिन्यांपूर्वी स्थगित करण्यात आले. मात्र परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येत आल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डानेही PSL च्या प्ले-ऑफच्या सामन्यांचं आयोजन केल. मात्र गेल्या काही दिवसांत ही स्पर्धा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरते आहे. कराची किंग संघाकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा शेर्फन रुदरफोर्ड हा खेळाडू चक्क मुंबई इंडियन्सचा किट आणि ग्लोव्ह्ज घालून पाकिस्तानात दाखल झाला. यावेळी सोशल मीडियावर PSL आयोजकांची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली.

हे ट्रोलिंक कमी होतं म्हणून की काय, क्वालिफायर १ चा सामना खेळताना कराचीच्या संघाकडून रुदरफोर्ड मुंबई इंडियन्सने ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला. मुलतानविरुद्धच्या सामन्यात कराचीच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ह्ज घालून मैदानात फलंदाजी करतानाचे रुदरफोर्डचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहत्यांनी पुन्हा एकदा PSL ला ट्रोलिंग करायला सुरुवात केली.

दरम्यान रुदरफोर्ड फलंदातीत आपली चमक दाखवू शकला नसला तरीही कराचीच्या संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यश मिळवलं.