News Flash

Video : …म्हणून त्याने ३०० किमीहून अधिक अंतर ट्रॅक्टर Reverse Gear मध्ये चालवत केलं पार

आठ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिलाय

(फोटो: व्हायरल व्हिडीओवरुन स्क्रीनशॉर्ट)

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. या रॅलीला सरकारकडून विरोध करण्यात आला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या परवानगीने रॅली काढण्याचा आदेश दिला. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे परवानगी मागितल्यानंतर काही अटी घालत पोलिसांनी या रॅलीला सशर्त परवानगी दिलीय. मात्र या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी एक ट्रॅक्टर चालक पंजाबवरुन दिल्लीपर्यंत चक्क रिव्हर्स गेअरमध्ये म्हणजेच उलटला ट्रॅक्टर चालवत आला आहे. अशाप्रकारे रिव्हर्स गेअरमध्ये थेट पंजाबवरुन दिल्लीपर्यंतचा साडेतीनशे किलोमीटरहून अधिकचा प्रवास करण्यामागे एक विशेष कारण असल्याचं या शेतकऱ्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा- दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला; पगडीही खेचण्यात आली

सांकेतिक पद्धतीने कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आपण रिव्हर्स गेअरमध्ये ट्रॅक्टर दिल्लीला नेत असल्याचं या शेतकऱ्याने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचा कृषी कायद्यासंदर्भातील निर्णय रिव्हर्स म्हणजेच मागे घ्यावेत अशी आपली मागणी असल्याचं हा शेतकरी सांगतो. या रिव्हर्स गेअरमध्ये ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. आठ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या ट्रॅक्टर रॅलीमध्ये पंजाब आणि हरयाणामधील हजारो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार आहेत. शहराच्या भोवती असणाऱ्या रिंग रोडवर ही रॅली होणार आहे.

आणखी वाचा- शेतकरी मोर्चात गोंधळ घालण्यासाठी ३०० पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल्स; पोलिसांचा दावा

२८ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमांवर पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी आंदोलन करत आहेत. यामध्ये सिंघू बॉर्डर, ठिकरी आणि गाझीयापूर सीमांचा समावेश आहे. तिन्ही शेतकरी कायदे परत घेण्यात यावेत या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. आमच्या मागण्यां सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला शांततेत ट्रॅक्टर रॅली काढायची आहे. ट्रॅक्टर शिस्तबंधपणे काढली जाईल. या रॅलीमध्ये काही रुग्णवाहिकाही असतील. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवरून ही रॅली काढण्यात येईल, असं शेतकरी नेते सतनाम सिंह पन्नु यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 9:49 am

Web Title: farmer reaches delhi on tractor in reverse gear to participate in rally on republic day scsg 91
Next Stories
1 Video : बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना लागली वाळवी; दोन लाख किंमतीच्या नोटा फस्त
2 ‘गावानं नाकारलं पण…देश स्वीकारणार’, फक्त १२ मतदारांचे मानले जाहीर आभार; पराभूत उमेदवाराचे अजब बॅनर
3 …म्हणून गब्बर सिंगला झाली शिक्षा; UP पोलिसांनी Video शेअर करत सांगितलं कारण
Just Now!
X