पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान या इंधनदरवाढीचा फटका दूधाच्या किंमतीलाही बसणार असून दुधाची किंमतही पेट्रोलप्रमाणेच १०० चा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ट्विटरवरही 1मार्च_से_दूध_100_लीटर हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. या ट्रेण्डअंतर्गत एक मार्चपासून दुधाची किंमत प्रति लीटर १०० रुपये होणार असल्याचा दावा केला जातोय. संबंधित दिल्लीजवळील सिंघू सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी नेता मलकीत सिंह यांच्या हवाल्याने पत्रिका या हिंदी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

अशाप्रकारची कोणतीही बातमी आली आणि त्याची सोशल नेटवर्किंगवर चर्चा झाली नाही असं सामान्यपणे होत नाही. याच बातमीचे वार्तंकन करण्यात आलेल्या पेपरचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. ट्विटरवरही या १०० रुपये लीटर दुधाची चांगलीच चर्चा आहे. त्यामुळेच #1मार्च_से_दूध_100_लीटर या हॅशटॅगसहीत ५४ हजारांहून अधिक जणांनी ट्विट केले आहेत. #1मार्च_से_दूध_100_लीटर हा हॅशटॅग ट्रेण्डमध्येही आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

ज्या बातमीवरुन हा ट्रेण्ड निर्माण झाला आहे त्यानुसार, ‘सिंघू बॉर्डरवरील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दुधाचे दर वाढवण्याचे वक्तव्य केलं आहे. भारतीय किसान यूनियनचे जिल्हा प्रमुख मलकीत सिंह यांनी एक मार्चपासून शेतकरी दुधाचे दर वाढवणार असल्याचे सांगितले आहे. पन्नास रुपयांचे दूध दुप्पट किंमतीमध्ये म्हणजेच १०० रुपये लीटर दराने विकलं जाणार आहे. मलकीत सिंह यांनी केंद्र सरकारने डिझेलचे दर वाढवून शेतकऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.’ काही वृत्तपत्रांनी याच वृत्ताच्या आधारे वार्तांकन केलं असलं तरी कोणीही यासंदर्भातील वृत्ताचा संपूर्ण तपास केलेला नाही.