आपल्या मुलांनी शाळेत जावं, शिकावं, शिकून मोठं व्हावं असं कोणत्या पालकांना नाही वाटणार? आपल्याला शिक्षण मिळालं नाही पण किमान मुलाच्या वाट्याला अशी उपेक्षा येऊ नये असं प्रत्येक पालकाला वाटतं म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी पालक वाटेल ते करायला तयार होतात. अगदी वेळप्रसंगी मुलं शाळेत जायला टाळत असली तरी काही पालक दमटावून किंवा मारझोड करून आपल्या पाल्याला शाळेत पाठवतातच. पण काही वेळा काही पालकही अतिरेक करतात.

व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा वेगळीच बाजू समोर आली आहे. मुलगी शाळेत जायला ऐकत नाही म्हटल्यावर वडिलांनी तिला आपल्या स्कूटरच्या मागच्या बाजूला अक्षरश: बांधलं आणि तिला जबरदस्ती शाळेत घेऊन गेले. अशा अतिरेकी वागण्यामुळे मुलीच्या जीवाला धोका निर्माण होईल याचा साधा विचारही या वडिलांनी केला नसावा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुलींच्या वडिलांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी अखेर वडिलांना समज देऊ घरी सोडलं आहे.

चीनमधला हा व्हिडिओ असल्याचं समजत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी आग्रही असायलाच पाहिजे पण त्यासाठी अशाप्रकारे मुलांशी वर्तणूक करणं योग्य की अयोग्य? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.