News Flash

संपूर्ण विमानामध्ये एकच प्रवासी; मात्र प्रवासात एवढा कंटाळा आली की…; वाचा ‘महाराजा’ची कहाणी

विमानामध्ये एकट्याने केलेला हा दुर्मिळ प्रवास त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्याची संधी सोडली नाही. क्रु मेंबर्स, वैमानिकांसोबत फोटो काढल्याचंही त्यांनी सांगितलं

एअर इंडियाच्या विमानामधून तीन तास एकट्यानेच प्रवास केला. (फोटो : एएनआयवरुन साभार)

एक संपूर्ण विमान केवळ तुमच्यासाठी बुक करुन तुम्हाला प्रवासाला जायला सांगितलं तर कसं वाटेल? एकदम राजा वगैरे असल्याचा फील येईल नाही का? मात्र एका व्यक्तीबरोबर योगायोगाने असं घडलं आहे. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमधील भारतीय वंशाचे उद्योजक आणि बऱ्याच संस्थाना आर्थिक मदत करणारे एस. पी. सिंग ओबेरॉय यांना हा अनुभव नुकताच आला. अमृतसर ते दुबंई असा प्रवास करणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानामध्ये एस. पी. सिंग हे एकमेव प्रवासी होते.

नक्की पाहा >> Photos: अबब… काही किलोमीटरपर्यंत पसलं आहे हे कोळ्यांचं जाळं; जाणून घ्या नक्की काय घडलंय

ओबेरॉय यांनी या तीन तासांच्या प्रवासादरम्यान मला अगदी महाराजा असल्यासारखं वाटतं होतं अशी प्रतिक्रिया दिलीय. “मी अमृतसरवरुन दुबईला जाण्यासाठी एअर इंडियाच्या (एआय ९२९) विमानामध्ये २३ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास बसलो. या विमानामध्ये मी एकमेव प्रवासी होतो. मला माझ्या संपूर्ण प्रवासादरम्यान महाराजा असल्यासारखं वाटतं होतं,” असं ओबेरॉय यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> कर्तव्यनिष्ठा… खांद्यावर लसींचा बॉक्स, पाठीवर मुलीला घेऊन नदी ओलांडून ‘ती’ लसीकरणासाठी गावात पोहचली

विमानातील सर्व क्रु मेंबर्स आणि वैमानिक खूपच नम्र होते, असंही ओबेरॉय यांनी म्हटलं आहे. विमानामध्ये एकट्याने केलेला हा दुर्मिळ प्रवास ओबेरॉय यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्याची संधी सोडली नाही. मी क्रु मेंबर्स आणि वैमानिकांसोबत फोटो काढल्याचंही ओबेरॉय यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> …म्हणून फेसबुकवरील Haha इमोजीविरोधात मुस्लीम धर्मगुरुने काढला फतवा

सुरुवातीला गंमत वाटल्यानंतर ओबेरॉय यांना नंतर एवढा कंटाळा आला की विमानामधील एकूण आसने किती आहेत, खिडकीत असणारी म्हणजेच विंडो सीट्स किती आहेत हे मोजू लागले. इतकच नाही त्यांना लहान मुलांप्रमाणे पावलांनी विमानाची लांबी किती आहे हे सुद्धा मोजलं. तसेच त्यांनी ‘जो बोले सो निहाल’ आणि ‘सत श्री अकाल’ या दोन घोषणांचीही रिकामं विमान बघून मला आठवण आल्यांचं सांगितलं.

नक्की वाचा >> फ्रान्समधील विमानतळावर करण्यात आलं ‘न्यूड चेकिंग’; दक्षिण आफ्रिकन गायिकेचा आरोप

हा माझ्यासाठी वन्स इन लाइफ टाइम अनुभव होता असंही ओबेरॉय यांनी सांगितलं. मात्र पुन्हा एकदा अशाप्रकारे एकट्याने प्रवास करायला आवडेल का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता ओबेरॉय यांनी नकारात्मक उत्तर दिलं. “मला पुन्हा एकदा अशापद्धतीने एकट्याला प्रवास करण्याची संधी दिल्यास मी नकार देईल. हा अनुभव आयुष्यातून एकदा ठीक आहे मात्र हा प्रचंड कंटाळवाणा प्रवास होता,” असं ओबेरॉय म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 6:39 pm

Web Title: felt like a maharaja says businessman who was only passenger on dubai flight scsg 91
टॅग : Dubai,India News
Next Stories
1 बिहार: मल्याळम अभिनेत्रीचा फोटो पेपरात चिकटवून आला, पासही झाला पण…
2 लसीकरणाचा Missed Call; सुई टोचली पण….
3 ‘मेड इन बांग्लादेश’ बिस्किटची भारतीय बाजारपेठेत जबरदस्त चर्चा
Just Now!
X